Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू

वनपुरी परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने वन विभागाने तातडीने पिंजरा बसविला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2025 | 12:30 AM
वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू

वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू

Follow Us
Close
Follow Us:
  • वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा
  • बिबट्या पकडण्यासाठी हालचाली सुरू
  • सासवडच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे आवाहन
सासवड : वनपुरी येथील सुतारमळा परिसरात सकाळी सकाळीच एका वाघाने दर्शन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याबाबत सासवड वन विभागाला माहिती दिल्यानंतर दौंडच्या रेस्क्यू टीमने बिबट परिसराची पाहणी केली होती. दरम्यान वनपुरी परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने वन विभागाने तातडीने पिंजरा बसविला आहे. तरीही वन विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत

वनपुरीजवळील उदाचीवाडीमध्ये काही दिवसापूर्वीच एका शेतकऱ्याला सायंकाळच्या वेळी एक बिबट्या दिसला होता. त्यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो आढळून आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त होती. या भीतीतून बाहेर येत नाही तोपर्यंतच सोमवारी सकाळी वनपुरीच्या सुतार मळ्यात शेतकऱ्यांना सकाळी सकाळीच एका वाघिणीचे दर्शन झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच सासवडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दौंड वन विभागाच्या रेस्क्यू टीमला तातडीने पाचारण केले होते.

त्यानंतरही वनपुरी गावच्या मगरवस्ती परिसरात सलग बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती. श्री भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुंभारकर यांनीही वन विभागाचे अधिकारी सागर ढोले यांच्यासह पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत आदींना निवेदन देवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत वन प्रशासनाने वनपुरीच्या सुतार मळ्यात तातडीने पिंजरा बसवून नागरिकांना एकप्रकारे दिलासा दिला आहे.

सासवडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक योगेश नजन, धनंजय देवकर, रणजीत चव्हाण, वन कर्मचारी नवनाथ मेमाणे, किशोर कुंभारकर यांनी पिंजरा बसविला आहे. श्री भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुंभारकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी महामुनी, लंकेश महामुनी, तुकाराम महामुनी, शरद कुंभारकर, भगीरथ कुंभारकर, सुनील कुंभारकर, अक्षय कुंभारकर, संदीप महामुनी, राजेंद्र महामुनी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

तातडीने पिंजरा बसवावा

ग्रामस्थांच्या मागणीनुसार वन विभागाने तातडीने सुतार मळ्यात पिंजरा बसविला आहे, त्यामुळे या परिसरात पुन्हा बिबट्या किंवा वाघ आल्यास त्याचा बंदोबस्त होईलच. मात्र वनपुरीच्या मगर वस्ती आणि कुंभारवळणच्या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत आहे. त्यामुळे या भागात वन विभागाने तातडीने पिंजरा बसवावा, अशी मागणी माजी सरपंच रामदास कुंभारकर, महेश मगर, सुदाम कुंभारकर, ज्ञानदेव खेडेकर तसेच या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

परिसरात पुरेशी विद्युत व्यवस्था ठेवावी

नागरिकांच्या मागणीनुसार जिथे आवश्यक आहे. त्या परिसरात वन विभागकडून तातडीने पिंजरे बसविण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्या बरोबरच शेतकऱ्यांनी समूहाने काम करावे, रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी. सद्यस्थितीत शक्यतो रात्रीची शेतीची कामे टाळावीत. घराच्या परिसरात पुरेशी विद्युत व्यवस्था ठेवावी, असे आवाहन सासवडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी केले आहे.

Web Title: A cage has been installed in the vanpuri area to capture the leopard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Farmers
  • Leopard
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध
1

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार
2

बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
3

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

Amravati News: रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय, परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा
4

Amravati News: रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय, परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.