Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus : एसटीच्या चालकांच्या दंड वसुलीत शिथिलता देण्यात यावी, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

st bus news: एसटी बस हे प्रवासी वाहतूक करणारे वाहन असून कुठलही अनुचित घटना घडू नये यासाठी बसेस ८० वेग मर्यादेवर लॉक केलेल्या आहेत. एसटीची सुटण्याची आणि पोचण्याची वेळ ठरवून दिलेली असते.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 17, 2025 | 05:40 PM
वारकऱ्यांना गावातूनच मिळणार एसटी बस; तब्बल 5000 गाड्यांचे एसटी महामंडळाचे नियोजन

वारकऱ्यांना गावातूनच मिळणार एसटी बस; तब्बल 5000 गाड्यांचे एसटी महामंडळाचे नियोजन

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आर.टी. ओ. ने घालून दिलेली ताशी ८० किलो मिटर व घाट सेक्शन मध्ये ताशी ४० किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडल्या बद्दल बऱ्याच एसटी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून आता पर्यंत लाखो रुपयांच्या दंडाच्या रक्कमेची वसुली सदर वाहन चालविणाऱ्या चालकाच्या पगारातून करण्यात आली आहे .विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना ठरवून दिलेल्या वेळेत उचित स्थळी पोहचविण्यासाठी किंवा रस्त्यातील वाढलेल्या वाहतुकीचा विचार करून वेग मर्यादा किंचित वाढल्यास एसटी ही सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी संस्था असल्याने एसटीच्या वाहनाला दंडाच्या रक्कमेत शिथिलता देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

बसवरील नियंत्रण सुटलं अन्…; अंगावर शहारे आणणारा एसटी बसचा भीषण अपघात

एसटी बस हे प्रवासी वाहतूक करणारे वाहन असून कुठलही अनुचित घटना घडू नये यासाठी बसेस ८० वेग मर्यादेवर लॉक केलेल्या आहेत. एसटीची सुटण्याची व पोचण्याची वेळ ठरवून दिलेली असते.कितीही वाहतूक कोंडी असली तरीही प्रवाशांना ठरवून देण्यात आलेल्या वेळेत उचित स्थळी पोहोचवायचे असते. काही प्रवाशांचा तर तिथून पुढचा प्रवास रेल्वे,बस, छोटी वाहने व विमानाचा असतो अशा वेळी विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना विनंतीवरून रस्त्यावरची स्थिती बघून लेन कटिंग करून पुढे जावे लागते.कधी कधी रुग्ण प्रवाशांना तसेच रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांना त्यांनी केलेल्या विनंती वरून एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन मार्गक्रमण करीत असल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून उचित स्थळी पोहोचवायचे असते.

त्याच प्रमाणे एसटीच्या चालकांनी गर्भवती महिलांना सुद्धा वेळेत रुग्णालयात दाखल केल्याच्या घटना सुद्धा समाज माध्यमांवर गर्वाने व कौतुकाने सांगितल्या जातात.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेग मर्यादा घालून देण्याचा सरकारचा नियम योग्य असला तरी मानवतेचा व रस्त्यावरील परिस्थितीचा तसेच एसटीच्या एकंदर सेवेचा विचार केल्यास त्यात वेग मर्यादेत किंचित वाढ झाल्यास एसटीच्या वाहनाला शिथिलता देण्यात आली पाहिजे कारण सुरक्षिततेच्या एकूण आकडेवारीचा विचार केल्यास आजही एसटी सर्वात अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. एकंदर सेवेचा विचार करून एसटीच्या वाहनाला विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादेत शिथिलता देण्यात यावी. या विषयावर आर टी ओ व एसटीचे व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली पाहिजे.व निश्चित धोरण ठरविण्यात आले पाहिजे एसटीकडून असा दंड वसूल करताना तिच्या सेवेचा व यापुढे चालकांच्या पगारातून अशी वसुली करताना त्यांच्याही आर्थिक स्थितीचा सहानुभूती पूर्वक विचार करण्यात आला पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.

या शिवाय घाट सेक्शन मध्ये चढावाला व उताराला एसटीच्या वाहनाची वेग मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मागे व पुढे असलेल्या वाहनांमुळे ते कधी कधी शक्य होत नाही.अश्यावेळी रस्त्यावरची पुढची स्थिती बघून वाहन चालवावे लागते.त्यामुळे उतार व चढावाला एसटी हे शासकीय वाहन असल्याने त्याची वेग मर्यादा ताशी ४० किमी ऐवजी किंचित वाढल्यास दंड वसूल करण्यात येऊ नये. त्याच प्रमाणे आता पर्यंत एसटीकडून लाखो रुपयांची दंड वसुली करण्यात आली असून एकवेळची बाब म्हणून ही दंडाची रक्कम एसटीला परत देण्यात यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

Disaster Management: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित रहावे; नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन

Web Title: A demand has been made by the maharashtra st employees congress to relax penalties on st drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • ST News

संबंधित बातम्या

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!
1

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…
2

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…
3

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…

दिवाळीत एसटीच्या ऑनलाईन बुकिंगला पसंती; तब्बल 21.44 कोटींची झाली तिकीट विक्री
4

दिवाळीत एसटीच्या ऑनलाईन बुकिंगला पसंती; तब्बल 21.44 कोटींची झाली तिकीट विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.