
एसटी महामंडळातील स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नंदकुमार कोलारकर सेवा निवृत्त
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर हे आज ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त झाले. कोलारकर हे पहिल्यांदा आगार व्यवस्थापक म्हणून महामंडळात रुजू झाले व त्यानंतर विविध पदावर काम केल्यानंतर ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर महाव्यवस्थाक म्हणून सेवा निवृत्त झाले.
अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, महाव्यवस्थापक पदाच्या काळात त्यांनी महामंडळात अनेक चांगले निर्णय घेतले. डिझेलवरील ७०० जुन्या गाड्या एल एन जी, व सी एन जी मध्ये रूपांतरित करण्यात आल्या. गेल्या वर्षी २६४० नवीन गाड्या घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे ३००० गाड्यांची निविदा प्रक्रिया काढण्यात आली असून ५००० नवीन गाड्यांसाठी प्री बीड झाले आहे.
आपल्या महाव्यवस्थापक पदाच्या काळात एसटीच्या ताफ्यात १०, ६४० नवीन गाड्या आणण्याचा बहुमानसुद्धा त्यांना मिळाला आहे. याशिवाय ७०० शिवशाही बसचे नीम आराम व साध्या गाड्यांमध्ये रुपांतर करण्याची कामगिरी सुद्धा त्यांनी लीलया पार पाडली. इंधन बचत करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले व त्यातही त्यांना यश आले. त्यांच्या सोबत याच विभागातील मुख्य यंत्र अभियंता चालन, सुनील वाघचौडे हे सुद्धा महामंडळाच्या ३५ वर्षाच्या सेवे नंतर आज सेवा निवृत्त झाले…या दोघांचाही यशस्वी सेवानिवृत्ती निमित्त आज महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सत्कार केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी संतोष गायकवाड, सोमनाथ मांढरे, साक्षी कलमकर व सिद्धिका चौलकर हे सुद्धा उपस्थित होते.
नेहमीच्या अटींमध्ये निवृत्तीचे कमाल वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि वैद्यकीय आणि वैज्ञानिक तज्ञांच्या बाबतीत वगळता, ज्यांना प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर, ६२ वर्षांपर्यंत सेवेत वाढ दिली जाऊ शकते, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयापेक्षा जास्त सेवेत वाढ करण्यास पूर्णपणे बंदी असेल.
६५ वर्षे वय पूर्ण झाल्यावर ५%, ७० वर्षे वय पूर्ण झाल्यावर १०%, ७५ वर्षे वय पूर्ण झाल्यावर १५% अतिरिक्त पेन्शन प्रदान करण्यासाठी ही मुदत वाढवण्याची शिफारस करण्यात आली . वैद्यकीय सुविधा: समितीने असे नमूद केले की केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) फक्त काही राज्यांच्या राजधान्या आणि मोठ्या शहरी केंद्रांपुरती मर्यादित आहे.