रिसोड : तालुक्यातील मांडवली येथील २२ वर्षीय शेतकरी पुत्राने आत्महत्या केली. ही घटना ३ जुलै रोजी दुपारी ३ च्या दरम्यान उघडकीस आली. इंदल कैलास चव्हाण (२२) असे मृतकाचे नाव आहे. युवकाने आत्महत्या का केली या बाबतीत अजून कुठलीही माहिती पुढे नसून या बाबतीत पोलीस तपास सुरु आहे. तरी, या आत्महत्या प्रकरणी विविध चर्चा सुरु आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृतक इंदलने आपल्या राहत्या घरी स्लैबच्या कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मांडवा येथील पोलीस पाटील माणिक गरकळ यांनी रिसोड पोलीसांना कळविली. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविला आहे.