Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृष्णा काठावर आता लवकरच पूरसंरक्षक भिंत बांधली जाणार; राज्य सरकारकडून 16.92 कोटींचा निधी मंजूर

डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रुक्मिणीनगर भागात कृष्णा नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी महायुती सरकारने तब्बल १६ कोटी ९२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2025 | 03:33 PM
कृष्णा काठावर आता लवकरच पूरसंरक्षक भिंत बांधली जाणार; राज्य सरकारकडून 16.92 कोटींचा निधी मंजूर

कृष्णा काठावर आता लवकरच पूरसंरक्षक भिंत बांधली जाणार; राज्य सरकारकडून 16.92 कोटींचा निधी मंजूर

Follow Us
Close
Follow Us:

कराड : कराड शहरातील रुक्मिणीनगर परिसरात कृष्णा नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी महायुती सरकारने तब्बल १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मंजूर झालेल्या या निधीमुळे पुरामुळे त्रस्त होणाऱ्या रुक्मिणीनगर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कृष्णा नदीला गेल्या काळात आलेल्या पुरामुळे कृष्णा पुलाच्या खालील कराड शहराकडील बाजूची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन, नदीतीरावरील घरांची पडझड झाली होती. तसेच नदीच्या उजव्या तीरावर विशेषत: रुक्मिणीनगर परिसरात नागरी वस्ती व धार्मिकस्थळांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या परिसरात संरक्षण भिंत उभारण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. दरम्यान, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीही या भागात पूरसंरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे केली होती.

या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. भोसले यांनी भागातील नागरी वस्तीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी याठिकाणी तातडीने पूरसंरक्षक भिंत उभारण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.

डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रुक्मिणीनगर भागात कृष्णा नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी महायुती सरकारने तब्बल १६ कोटी ९२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. या निधीतून रुक्मिणीनगर येथे कृष्णा पूलाच्या खालील बाजूस कृष्णा नदीच्या उजव्या काठावर सा.क्र. २५ ते सा.क्र. ६५० मीटर लांबीची पूरसंरक्षक भिंत उभारली जाणार आहे. या पूरसंरक्षक भिंतीचे बांधकाम महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून केले जाणार आहे.

हेदेखील वाचा : महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

पूरसंरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे नदीच्या प्रवाहात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही जलसंपदा विभागाने दिले आहेत. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भिंतीच्या देखभालीची जबाबदारी कराड नगरपरिषदेकडे सोपविली जाणार आहे.

पूरप्रवण भागातील नागरिकांना दिलासा

महायुती सरकारच्या या निधी मंजुरीमुळे रुक्मिणीनगर परिसरातील पूरप्रवण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीकाठच्या वाढत्या वस्तीच्या संरक्षणासाठी ही पूरसंरक्षण भिंत महत्वाची ठरणार आहे. शासनाने हा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील नागरिकांमधून महायुती सरकार व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आभार व्यक्त केले जात आहेत.

Web Title: A flood protection wall will soon be built on the banks of krishna state government approves a fund of rs 1692 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

आदिवासी समाज आक्रमक! दिलीप भोईर यांचा सरकारला ‘अंतिम’ इशारा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार
1

आदिवासी समाज आक्रमक! दिलीप भोईर यांचा सरकारला ‘अंतिम’ इशारा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र
2

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र

45 दिवसांच्या आत ई-चालान भरा, अन्यथा…; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

45 दिवसांच्या आत ई-चालान भरा, अन्यथा…; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास
4

मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.