प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा सोडला. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना त्यांना दारुड्याची उपमा दिली आहे ते म्हटले आहे, दारुड्या जसं सामान विकतो तस ते नवरत्न विकायला नरेंद्र मोदी निघाले आहेत मी जास्त खोलपणे काय सांगू शकतो अशी टीका मोदी सरकारवर केली आहे.
एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा निशाण्याकर घेतलं आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भाजपची बी टीम असं म्हणत आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले ते भाजपमधून आले असून ते त्यांचा इतिहास विसरले. उद्धव ठाकरे हे धर्मवादीचे सेक्युलर वादी झाले आहेत असा निशाणा उद्धव ठाकरेंवर साधला आहे.
पुढे ते म्हणाले की, दिल्ली येथे शेतकरी आंदोलन झाले त्या ठिकाणी भेट द्यायला वेळ मिळाला नाही. शेतकऱ्याच्या खिशातून लाख काढतात आणि देतात किती बारा हजार, आमचे सरकार आले तर शेतकऱ्याच्या खत वस्तू वर कर माफ करू असे आवाहन त्यांनी जनतेला दिले आहे. संविधान बदलण्याचे विचार यांच्या मनात सुरु आहेत. सामान्य माणसाने निर्धार केला आहे भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला मत द्यायचे नाही. राम राम करतात आम्ही श्रीरामाला आणले आहे श्रीरामाला मत द्या. 35 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.