Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetti Protest Warning: सरकारला शॉक बसेल असा मोर्चा काढणार! राजू शेट्टी यांचा वर्षा बंगल्यावर धडकण्याचा इशारा

Raju Shetti Protest Warning: आंबा काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. याच कारणास्तव दि. १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 08, 2026 | 04:28 PM
Raju Shetti, Konkan Farmers, Mango Cashew Growers, Varsha Bungalow, Farmer Protest

Raju Shetti, Konkan Farmers, Mango Cashew Growers, Varsha Bungalow, Farmer Protest

Follow Us
Close
Follow Us:
  • आंबा बागायतदारांना हेक्टरी केवळ २२ हजार रुपये
  • सरकारने आंबा उत्पादकांना काही प्रमाणात मदत पण  काजू उत्पादक पूर्णपणे वाऱ्यावर
  • अडीच महिन्यांपासून संघर्ष करूनही सरकारने दखल  घेतली नाही
Raju Shetti Farmers Protest Warning: कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी आम्ही गेली अडीच महिने संघर्ष करत आहोत. मात्र, सरकारने पोकळ आश्वासने वगळता दखल घेतलेली नाही. याच कारणास्तव येत्या   १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान असा भव्य मोर्चा आंबा व काजू बागायतदार यांच्यावतीने काढण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सरकारला शॉक बसेल, असा हा मोर्चा असणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळ माने, कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या जिल्हाभरातील आंबा काजू शेतकरी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी जलवाहिनीला मोठी गळती; 

शेट्टी म्हणाले, आंबा काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीबाबत सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद नाही. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर फक्त थोडीफार जुजबी चर्चा झाली. पण आंबा, काजू शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. ‘राजा उदार झाला आणि हातात भोपळा दिला’ अशी अवस्था आंबा काजू शेतकऱ्यांची झाली आहे. आंबा शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २२ हजार रुपये शासनाने जाहीर केले. म्हणजे एका कलमाला २२० रुपये मिळतात. तर काजू शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावरच सोडले असून ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असेही शेट्टी म्हणाले.

भरपाई मिळवून देण्यात कोकणातील लोकप्रतिनिधी अपयशी

शेट्टी म्हणाले, वास्तविक कोकणातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच काहीतरी मागत आहे. सरकारने त्यांना मुक्त हस्ते मदत द्यायला हवी होती. सरकारने सध्या जे निकष लावलेत त्यानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळून ७० ते ७५ कोटी एवढीच मदत मिळणार आहे. वास्तविक नाशिक कुंभमेळ्यासाठी १५ हजार कोटींवरून ३५ हजार कोटींची तरतूद केली जाते. पण शेतकऱ्यांसाठी केवळ ७० ते ७५ कोटी रुपये दिले जातात, ही बाब अत्यंत संताप जनक आहे. आंबा, काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचेही शेट्टी म्हणाले.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार

भरपाई मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

आंबा काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. याच कारणास्तव दि. १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मुंबईस्थित कोकणी बांधव तसेच कोकणातील पाचही जिल्ह्यांमधील आंबा, काजू शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहोत. आंबा, काजू उत्पादकांना न्याय न मिळाल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. सदरचा मोर्चा दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी येथून सुरू होणार आहे. यापुढे शेतकरी गप्प बसणार नाहीत. तर या मोर्चाला अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

 

Web Title: A march to shock the gov raju shetti warns of massive protest from girgaon chowpatty to cms residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Raju Shetti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.