Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरानसारखीच ‘मिनी ट्रेन’ धावणार आता पाटण तालुक्यात; पर्यटनाला मिळणार चालना

टण तालुक्यात माथेरानच्या धर्तीवर मिनी ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. रेल्वे मंत्रालयाशी बोलून या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 21, 2025 | 11:19 AM
माथेरानसारखीच 'मिनी ट्रेन' धावणार आता पाटण तालुक्यात; पर्यटनाला मिळणार चालना

माथेरानसारखीच 'मिनी ट्रेन' धावणार आता पाटण तालुक्यात; पर्यटनाला मिळणार चालना

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राज्य शासनाने पाटण तालुक्यातील पर्यटन संवर्धनाच्या दृष्टीने ७० कोटी रुपयांच्या पाच नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एका महिन्यात काम सुरू होईल. पाटण तालुक्यात माथेरानच्या धर्तीवर मिनी ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. रेल्वे मंत्रालयाशी बोलून या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे इत्यादी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात पापर्डे, हेळवाक, मेंढघर, येराड, कोयनारासाटी, कुसवडे कारवट येथे ७० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प राबवत आहे. यामध्ये गॅलरी स्पोर्ट्स, मीटिंग रूम, रेस्टॉरंट, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी याशिवाय तेथील पायाभूत सुविधा इत्यादी कामांना सुरुवात होणार आहे. या कामांच्या निविदा एक महिन्यात काढण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

हेदेखील वाचा : कास पठारावर धावणार आता इलेक्ट्रिक वाहने; चार गाड्या लवकरच होणार दाखल

दरम्यान, या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कामांची ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर कडवट टीका केली होती. या टीकेच्या संदर्भात बोलताना देसाई म्हणाले, पडळकर यांचे विधान शंभर टक्के चूक आहे. व्यक्तिगत पातळी पातळीवर कोणी कोणावर जास्त टीका करू नये, असे ते म्हणाले.

गद्दारीचा आरोप करणारे राऊतच खरे गद्दार

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेच्या संदर्भात बोलताना मंत्री देसाई म्हणाले, संजय राऊत पहिले गद्दार आहेत. पदासाठी उद्धव ठाकरे यांना आघाडी करायला लावली. महायुतीतून निवडून आले आणि महाविकास आघाडीचा घाट घातला. आमच्यावर गद्दारीचा आरोप करणारे राऊतच खरे गद्दार आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही

मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर देसाई म्हणाले, राज्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. विनाकारण आरक्षण प्रक्रियेच्या निमित्ताने कोणत्याही मुद्द्याला जातीय वळण देऊ नका. सर्वसामान्यांनी समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.

Web Title: A mini train like matheran will now run in patan taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

कास पठारावर धावणार आता इलेक्ट्रिक वाहने; चार गाड्या लवकरच होणार दाखल
1

कास पठारावर धावणार आता इलेक्ट्रिक वाहने; चार गाड्या लवकरच होणार दाखल

Mahabaleshwar Panchgani in UNESCO : महाबळेश्वर अन् पाचगणीचा वाढला मान! युनोस्कोच्या यादीमध्ये मिळवले स्थान
2

Mahabaleshwar Panchgani in UNESCO : महाबळेश्वर अन् पाचगणीचा वाढला मान! युनोस्कोच्या यादीमध्ये मिळवले स्थान

‘खुनाचा बदला खुनाने’ घेण्याचा डाव फसला; शिरवळमध्ये भरदिवसा गोळीबार, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
3

‘खुनाचा बदला खुनाने’ घेण्याचा डाव फसला; शिरवळमध्ये भरदिवसा गोळीबार, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

Satara Hill Marathon: सातारा हिल मॅरेथॉन, यवतेश्वर घाटातून आरोग्यदायी धाव; हजारो स्पर्धकांचा मॅरेथॉनला प्रतिसाद
4

Satara Hill Marathon: सातारा हिल मॅरेथॉन, यवतेश्वर घाटातून आरोग्यदायी धाव; हजारो स्पर्धकांचा मॅरेथॉनला प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.