Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरे हतबल मुख्यमंत्री, अडीच वर्षांच्या काळात त्यांना…; भाजपच्या बड्या नेत्याची टीका

बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कारकिर्दीत पाहिलेला पहिला हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 12, 2025 | 11:29 AM
उद्धव ठाकरे हतबल मुख्यमंत्री, अडीच वर्षांच्या काळात त्यांना...; भाजपच्या बड्या नेत्याची टीका

उद्धव ठाकरे हतबल मुख्यमंत्री, अडीच वर्षांच्या काळात त्यांना...; भाजपच्या बड्या नेत्याची टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
  • पुरंदर विमानतळाबाबतही बावनकुळेंनी दिली प्रतिक्रीया
  • घायवळ प्रकरणावरुन महाविकास आघाडीला विचारला सवाल

पुणे : उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्रीपद समजलेच नाही. ते विधानसभेत केवळ दोन वेळा आणि मंत्रालयात दोन वेळा आले. माझ्या राजकीय कारकिर्दीत पाहिलेला पहिला हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे सर्वात सक्षम मुख्यमंत्री ठरले आहेत, असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. बावनकुळे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

बावनकुळे म्हणाले, प्रकल्प थांबले तरी चालतील पण दिवाळीत शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी साडेएकतीस हजार कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. हा पिक विमा नसून थेट मदत आहे. विरोधकांचे आरोप चुकीचे असून ते केवळ राजकारण करत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

घायवळच्या पासपोर्ट प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी विचारले की, गुंड निलेश घायवळला शस्त्र परवाना कुणाच्या सरकारने दिला? पासपोर्टची शिफारस करताना त्याच्यावर गुन्हे नाहीत, असे कोणाच्या सरकारच्या काळात सांगण्यात आले? हे सर्व पोलिस तपासातून स्पष्ट होईल. आता सरकारचे प्राधान्य म्हणजे उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांना जेरबंद करणे आहे. राम शिंदे आणि घायवळ यांच्या संबंधाबद्दल शिंदे यांनाच विचारावे लागेल. जोपर्यंत न्यायालय शिक्षा देत नाही, तोवर गुन्हेगार कसे समजायचे, असेही बावनकुळे म्हणाले.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असून जमिनींचे तुकडे पडत आहेत. दररोज मोजणीचे २५ ते ३० प्रस्ताव येतात. खरेदीखत करण्यापूर्वी मोजणी करणे गरजेचे असल्याने राज्य सरकारने परवानाधारक खासगी भूमापकांकडून मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज आल्यानंतर ३० दिवसांत मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर खरेदीखत व फेरफार करता येईल. मोजणी केल्यानंतर आमचे अधिकारी तपासणी करून मंजुरी देतील. यातून शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पुरंदर विमानतळाबाबत ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित लवकरच पूर्ण होईल. विमानतळाच्या प्रभावी क्षेत्रात कोठेही घरे किंवा उंच इमारती होणार नाहीत आणि त्या भागात खरेदी-विक्रीस परवानगी दिली जाणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: A senior bjp leader has criticized former chief minister uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • Aditya Uddhav Thackeray
  • Chandrasekhar Bawankule
  • pune news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
1

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
2

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम
3

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम

Uddhav Thackeray: ‘एक दिवस हा माणूस धोका देणार’; अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप
4

Uddhav Thackeray: ‘एक दिवस हा माणूस धोका देणार’; अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.