Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : शेकोट्या पेटल्या; तापमानात घसरण! चिखलदऱ्यात धुक्याची चादर; ग्रामीण भागात वाढला थंडीचा कडाका

वातावरणीय बदलाने दिवसेंदिवस हवामान बदलत आहे याचा ऋतुमानावर परिणाम झाला आहे. हिवाळा सुरू असून गेली आठ दिवसांपासून गायब झालेल्या गुलाबी थंडीला गुरुवारपासून पुन्हा सुरूवात झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 10, 2025 | 11:24 AM
शेकोट्या पेटल्या; तापमानात घसरण! चिखलदऱ्यात धुक्याची चादर; ग्रामीण भागात वाढला थंडीचा कडाका (फोटो सौजन्य-ChatGPT)

शेकोट्या पेटल्या; तापमानात घसरण! चिखलदऱ्यात धुक्याची चादर; ग्रामीण भागात वाढला थंडीचा कडाका (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Close
Follow Us:
  • गावांमध्ये तापमान झपाट्याने घसरले
  • आकाश निरभ्र झाल्याने उष्णतेचा अंशदेखील कमी
  • गावागावांत ठिकठिकाणी अलाव पेटवले

अमरावती जिल्ह्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून ग्रामीण भागात थंडीने चांगलाच कहर माजवला आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या शिरजगाव कसब्यासह परिसरातील गावांमध्ये तापमान झपाट्याने घसरले आहे. गत काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी थंडी जाणवू लागली असून गुरुवार (दि. ६) रात्रीपासून गारव्याचा प्रभाव आणखी तीव झाला आहे. आकाश निरभ्र झाल्याने उष्णतेचा अंशदेखील कमी झाला असून, पहाटे व रात्री थंडीचा कडाका वाढला आहे. लोकांनी उब मिळवण्यासाठी शेकोट्यांभोवती बसण्यास सुरुवात केली आहे. गावागावांत ठिकठिकाणी अलाव पेटवले जात आहेत. दिवसाढवळ्याही गारवा जाणवत असल्याने नागरिक आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात पारा अधिक वेगाने घसरत असून रात्रीच्या वेळी दाट दवबिंदू आणि गारठ्याचा अनुभव येत आहे.

Amravati News: घरांवर ७८ मेगावॅट वीज निर्मिती, अमरावती जिल्ह्यात १९ हजार ३४९ ग्राहकांनी घेतला सूर्यघराचा लाभ

उबदार कपड्यांच्या बाजारात उलाढाल

थंडीने आपले ‘तेवर’ दाखवायला सुरुवात होताच, उबदार कपड्‌यांचा बाजार गुलजार झाला आहे. स्वेटर, जंकिट, मफलर, टोपी अशा वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. बाजारपेठांमध्ये हंगामी दुकानांची रेलचेल सुरू असून, गावातील साप्ताहिक चाजारातही ऊनी कपड्‌यांची विक्री वाढली आहे. लीक घराबाहेर पडताना उबदार कपड्‌यांशिवाय पाऊल टाकत नाहीत. मुले व ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे स्वेटर आणि शालींनी झाकलेले दिसत आहेत. पेट्यांमध्ये ठेवलेले लोकरी कपडे पुन्हा बाहेर काढले गेले असून, थंडीपासून बचावासाठी प्रत्येकजण सज्ज झालेला दिसतो.

मेळघाट आणि चिखलदरा ‘गारठ्यात गुंडाळले’

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा परिसर पूर्णपणे गारठ्‌याने वेढला आहे. चिखलदऱ्यात सकाळच्या वेळेस धुक्याची चादर पसरलेली दिसते. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण अधिकच मनोहारी झाले असून पर्यटकांची संख्या झपाट्‌याने वाढत आहे.
दरवषीप्रमाणे यंदाही चिखलदऱ्यातील तापमान ७ ते ८ डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले आहे. राज्यभरातून पर्यटक थंडीचा आनंद घेण्यासाठी चिखलदर्याकडे आकर्षित होत आहेत.

शेतीतही गारव्याचा परिणाम : नुकताच पावसाळा संपल्याने शेतात ओलावा कायम आहे. त्यामुळे वाढत्या थंडीत हा ओलावा अधिक गारठा निर्माण करत असून वातावरणात शीतलतेचा अंश वाढवतो आहे. अनेक शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मसूर वांस्तरख्या पिकांच्या पेरणीत व्यस्त आहेत.

हिवाळा पिकांसाठी अत्यंत लाभदायक

थंडीच्या या बातावरणामुळे पिकांना लाभदायी स्थिती निर्माण झाली असती, तरी अती थंडीचा परिणाम भाज्यांवर व फुलपिकांवर होऊ नये, यासाठी शेतकरी दक्षता घेत आहेत. एकूणच, अमरावती विलयात हिवाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. बडीचा आनंद पर्यटक घेत असले, तरी ग्रामीण भागातील जनजीवनावर तिचा प्रभाव टळकपणे दिसून येत आहे.

रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर, केवळ ५ हजार हेक्टरवरच लागवड; रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढले

आरोग्यावर थंडीचा परिणाम

मौसमातील बदलाचा परिणाम आता आरोग्यावरही स्पष्ट दिसू लागला आहे. सर्दी, खोकला, ताप, सायनस आणि दमा अशा तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज रुग्णसंख्या वाढताना दिसते. डॉक्टरांनी विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्धांनी काळजी पेण्याचे आवाहन केले आहे. थंडीपासून बचावासाठी गरम अन्न, पाणी आणि पुरेसा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: थंडीचा शेतीवर परिणाम होतो का?

    Ans: पावसाळा संपल्याने शेतात ओलावा कायम आहे. त्यामुळे वाढत्या थंडीत हा ओलावा अधिक गारठा निर्माण करत असून वातावरणात शीतलतेचा अंश वाढवतो आहे.

  • Que: थंडीचा आरोग्यावर परिणाम काय होतो?

    Ans: सर्दी, खोकला, ताप, सायनस आणि दमा अशा तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज रुग्णसंख्या वाढताना दिसते.

  • Que: थंडीचा कडाका कुठे वाढला आहे?

    Ans: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा परिसर पूर्णपणे गारठ्‌याने वेढला आहे. चिखलदऱ्यात सकाळच्या वेळेस धुक्याची चादर पसरलेली दिसते. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण अधिकच मनोहारी झाले असून पर्यटकांची संख्या झपाट्‌याने वाढत आहे.

Web Title: A severe cold wave has intensified in the rural areas of amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • amravati
  • imd
  • Weather

संबंधित बातम्या

ढगाळ हवामानाने द्राक्षबागा उद्ध्वस्त; तासगाव तालुक्यातील शेतकरी संकटात
1

ढगाळ हवामानाने द्राक्षबागा उद्ध्वस्त; तासगाव तालुक्यातील शेतकरी संकटात

Amravati Crime: चांदुररेल्वे कोठडी मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, अमरावती एसपींकडून निलंबनाची कारवाई
2

Amravati Crime: चांदुररेल्वे कोठडी मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, अमरावती एसपींकडून निलंबनाची कारवाई

Amravati : भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ICC महिला विश्वचषक जिंकला, सर्वत्र आनंद व्यक्त
3

Amravati : भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ICC महिला विश्वचषक जिंकला, सर्वत्र आनंद व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.