Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway RPF: वर्षभरात ८८ अल्पवयीन बालकांची सुटका, ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ची फलश्रुति

लॉकडाऊनच्या कालवधीपासून शहरातून अल्पवयीन मुलं मुली बेपत्ता होण्याचे प्रकार घडत होते. 'नन्हे फरिश्ते' या विशेष मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण ८८ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 12, 2026 | 05:51 PM
वर्षभरात ८८ अल्पवयीन बालकांची सुटका, ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते'ची फलश्रुति

वर्षभरात ८८ अल्पवयीन बालकांची सुटका, ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते'ची फलश्रुति

Follow Us
Follow Us:
  • वर्षभरात ८८ अल्पवयीन बालकांची सुटका
  • ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ची फलश्रुति
  • रेल्वे विभागाचा पुढाकार
गोंदिया : रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) नागपूर विभागाने २०२५-२६ या कालावधीत ‘नन्हे फरिश्ते’ या विशेष मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण ८८ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका केली आहे. ही मोहीम केवळ रेल्वे परिसरातील बालसुरक्षेसाठी मर्यादित नसून, मानवी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. नागपूर रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत रेल्वे संरक्षण दल सातत्याने दक्षतेने कार्यरत आहे. या मोहिमेद्वारे घरातून पळून गेलेली, हरवलेली किंवा कुटुंबापासून विभक्त झालेली मुले रेल्वे गाड्या, स्थानके आणि परिसरात आढळल्यास त्यांची ओळख पटवून त्यांना मानवी तस्करी, शोषण व इतर संभाव्य धोक्यांपासून संरक्षण दिले जाते. २०२५ या वर्षात ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेत एकूण ८० अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली.

महाशिवरात्री पूजा आणि हिंदू विधी थांबवा…! दर्गा समितीची सुप्रीम कोर्टात धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?

यामध्ये ५० मुलगे आणि ३० मुलींचा समावेश आहे. तर २०२६ मध्ये आतापर्यंत ८ अल्पवयीन मुलांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्येक प्रकरणात रेल्वे संरक्षण दलाने तातडीने कारवाई करत मुलांना चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात पडण्यापासून वाचवले आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांची माहिती ‘ट्रॅक चाइल्ड’ पोर्टलवर नोंदविण्यात येते. त्यानंतर नियमानुसार संबंधित जिल्हा बालकल्याण समितीकडे त्यांना सुपूर्द केले जाते. आवश्यक तपासणी आणि पडताळणीनंतर संबंधित मुलांना त्यांच्या पालकांकडे किंवा नातेवाईकांकडे सुरक्षितरित्या सोपविण्यात येते. आग्नेय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे हे प्रयत्न केवळ बचावकार्यापुरते मर्यादित नसून, हरवलेल्या व घरातून पळून जाणाऱ्या मुलांच्या समस्येबाबत समाजात जनजागृती करण्याचेही काम करत आहेत. ‘नन्हे फरिश्ते’ ही मोहीम अनेक असुरक्षित मुलांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.

पालक, प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन

रेल्वे संरक्षण दलाने नागरिक व प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे गाडी, स्थानक किंवा परिसरात कोणताही अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी कुटुंबापासून वेगळा, घरातून पळून गेलेला किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास तत्काळ रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी), संबंधित रेल्वे कर्मचारी किंवा जवळच्या आरपीएफ जीआरपी ठाण्याशी संपर्क साधावा. समाजाच्या सहकायनिच अशा मोहिमा अधिक प्रभावी ठरू शकतात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Web Title: Initiative by the railway department rescue of 88 underage children in a year success of operation little angels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • amravati
  • railway
  • RPF

संबंधित बातम्या

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?
1

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले
2

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले

Amravati Fire News: अमरावती रुग्णालय दुर्घटना: व्हेंटिलेटरपासून टेंडरपर्यंत सर्व बाबींची चौकशी; आबिटकरांची मोठी माहिती
3

Amravati Fire News: अमरावती रुग्णालय दुर्घटना: व्हेंटिलेटरपासून टेंडरपर्यंत सर्व बाबींची चौकशी; आबिटकरांची मोठी माहिती

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत
4

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.