Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनिल तटकरेंना धक्का, खालिद रखांगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांचा वेगळाच खेळ

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गटाला मान्यता दिली आहे आणि उपनगराध्यक्ष खालीद रखांगे या गटाचे प्रमुख म्हणून निवडले गेले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 30, 2024 | 09:22 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

दापोली : दापोलीमध्ये राजकीय उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी वेगळी चूल मांडल्याने सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. हा धक्का अजित पवार यांच्यासह सुनिल तटकरे यांना देखील मानला जातो. तटकरे या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गटाला मान्यता दिली आहे आणि उपनगराध्यक्ष खालीद रखांगे या गटाचे प्रमुख म्हणून निवडले गेले आहेत. अद्याप तरी या नगरसेवकांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या घडामोडीकडे कोकणचं लक्ष लागून राहिलं आहे. अजित पवार यांना हा एक धक्काच मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी घेतलेला हा निर्णय केवळ अजित पवार यांना तर महायुतीसाठी देखील धक्का आहे असे म्हंटले जात आहे. कोकणात घडणाऱ्या राजकीय घडामोडी या महत्त्वाच्या आहेत. मुख्यबाब म्हणजे राज्याच्या राजकारणात कोकणाला असलेलं महत्त्व देखील सध्या अधोरेखित होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. शक्ती प्रदर्शन, सभा यांनी सध्या कोकणचं राजकीय आभाळ भरून गेलं आहे. मतदारसंघावर होत असलेले दावे – प्रतिदावे, शक्ती प्रदर्शन यांनी साऱ्या गोष्टी ढवळून निघत आहेत. कोकणात प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमवणे आणि दाखवण्याच्या मागे लागला आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी देखील कुठं मागे नाहीत. शरद पवार आणि अजित पवार यांनी नुकताच कोकण अर्थात चिपळूण – संगमेश्वर या मतदारसंघाचा दौरा केला.

या ठिकाणी असलेले विद्यमान आमदार शेखर निकम सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत, तसं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोकणात फार मोठी नाही. पण, चिपळूण – संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवारी, विजय यासाठी सध्या दोन्ही बाजूनं जोर लावला जात आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर शरद पवार यांचा देखील दौरा झाला.पण, अजित पवार यांची पाठ फिरताच कोकणात त्यांना मोठा धक्का बसला आहे. दापोली नगरपरिषदेतील आठ पैकी सात नगरसेवकांनी थेट आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Web Title: A shock to sunil tatkare khalid rakange and seven corporators of ncp have a different game

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 09:22 AM

Topics:  

  • Dapoli
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar Group
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास
1

Sangli : प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसला सक्षम करेल, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास

Thane News : नागरिकांच्या समस्येवर प्रशासनाने दखल घ्यायलाच हवी; घोडबंदरमध्ये शरद पवार गटाचे आंदोलन
2

Thane News : नागरिकांच्या समस्येवर प्रशासनाने दखल घ्यायलाच हवी; घोडबंदरमध्ये शरद पवार गटाचे आंदोलन

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार: अजित पवार
3

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार: अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?
4

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.