Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी एकच प्राधिकरण हवे,पुढील ५० वर्षांचे नियोजन आवश्यक; आदित्य ठाकरे यांचे ठाम प्रतिपादन

मुंबईत विविध प्राधिकरणे यांच्यातील समन्वयाचा अभाव पाहता मुंबईच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, एकच प्राधिकरण असणे आणि पुढील ५० वर्षांसाठी ठोस व दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे ठाम मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2022 | 06:33 PM
मुंबईच्या सुरक्षिततेसाठी एकच प्राधिकरण हवे,पुढील ५० वर्षांचे नियोजन आवश्यक; आदित्य ठाकरे यांचे ठाम प्रतिपादन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईत विविध प्राधिकरणे यांच्यातील समन्वयाचा अभाव पाहता मुंबईच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, एकच प्राधिकरण असणे आणि पुढील ५० वर्षांसाठी ठोस व दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे ठाम मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईतील पूर जोखीम व व्यवस्थापन संदर्भात विचारमंथन करण्यासाठी मुंबई महापालिका व वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेच्या सहकार्याने सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात २८ व २९ एप्रिल रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.

यावेळी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मेस्त्री, मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, वरिष्ठ अधिकारी, पर्यावरण तज्ञ, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था यांचे तज्ञ, अभियंते, प्रतिनिधी हे उपस्थित होते.

मुंबईसह जगभरात ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतू बदल, हवामान बदल होऊन त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत कधी नव्हे ती भयंकर स्वरूपाची वादळे धडकत आहेत. कधी उष्णता वाढते तर कधी कडाक्याची थंडी पडते. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन सखल भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होत आहे. त्याचा मुंबई शहरावर, जनजीवनावर व एकूणच मुंबईकरांवर विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत विविध प्राधिकरणे यांच्यातील समन्वयाचा अभाव पाहता मुंबईच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, एकच प्राधिकरण असणे आणि पुढील ५० वर्षांसाठी ठोस व दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईची लोकसंख्या, वाढते शहरीकरण, वाढती रहदारी, प्रदूषण, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती हे पाहता मुंबईच्या सुरक्षिततेबाबत ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. मुंबईत एकीकडे झपाटयाने विकासकामे होत आहेत. मातीची मैदाने कमी होऊन उंच इमारती, सिमेंटचे रस्ते वाढत आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. ते पाणी नद्या, नाले यांना जाऊन मिळते. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही बदल होत आहेत. वाढत्या शहरीकरणात १९८० पासून ते आजपर्यंत मुंबईतील हरित पट्टे कमी झाले आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात कडाक्याची उष्णता जाणवते. गेल्या २-३ वर्षात मुंबईत वादळे धडकली. फेब्रुवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडून स्वेटर घालावे लागले होते. हवामान खात्याकडून पुढील तीन तासाचे अंदाज येतात मात्र पुढील तीन दिवसाचे अंदाज येत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत मुंबईच्या सुरक्षिततेबाबत विचारमंथन करणे, उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

[read_also content=”व्यवस्था पर्यावरणाप्रती असंवेदनशील : अ‍ॅड. असीम सरोदे https://www.navarashtra.com/maharashtra/the-system-is-insensitive-to-the-environment-adv-asim-sarode-nrdm-274126.html”]

मुंबई महापालिका सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. मात्र मुंबईत एखादा रस्ता बनवायचा असेल तर जमिनीखालील ४३ युटिलिटी हटविणे व त्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते. तसेच मुंबईत म्हाडा, एमएमआरडीए, रेल्वे अशी १६ विविध प्राधिकरणे असून त्यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवतो. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षिततेसाठी एकच प्राधिकरण असणे आणि किमान ५ वर्षांसाठी नव्हे तर पुढील ५० वर्षांसाठी ठोस व खास नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत मंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले. सत्रात प्रारंभी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पावसाळ्यात पालिकेने केलेल्या उपाययोजनांच्या माहितीचे सादरीकरण केले.

Web Title: A single authority is needed for the security of mumbai planning for the next 50 years is necessary aditya thackerays strong statement nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2022 | 06:33 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • C M Uddhav Thackeray
  • mumbai mahapalika
  • Mumbai News

संबंधित बातम्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
1

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
2

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप
3

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर
4

आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.