
Maharashtra Breaking News Updates Today: दक्षिण अमेरिकेत वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू
Mojtaba Khamenei Iran’s New Supreme Leader : मध्यपूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता अधिक भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत, इराणने अखेर आपला नवा ‘सुप्रीम लीडर’ (सर्वोच्च नेता) निवडला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या शक्तिशाली पदावर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी ( Mojtaba Khamenei) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे केवळ इराणमध्येच नाही, तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. विशेषतः इस्रायल आणि अमेरिका या देशांनी या निवडीवर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
09 Mar 2026 06:27 PM (IST)
बारामती : बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी येथील किरण रावसाहेब तावरे यांची तर उपसभापतीपदी गुणवडी येथील शुभांगी सुनील आगवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सभापती तावरे व उपसभापती आगवणे हे दोन्ही राष्ट्रवादीचेच आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे बारामती पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने एखादी निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
09 Mar 2026 06:23 PM (IST)
मुंबईतील Sathey College तर्फे ‘साठये करिअर कॉन्क्लेव्ह 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. विलेपार्ले येथे महाविद्यालयाच्या परिसरात येत्या 28 आणि 29 मार्च 2026 रोजी हा दोन दिवसीय उपक्रम पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन, शैक्षणिक पर्यायांची माहिती आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमधील 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक शाखांबाबत माहिती मिळावी, करिअरबाबत स्पष्टता निर्माण व्हावी आणि बदलत्या जागतिक परिस्थितीत उपलब्ध होत असलेल्या नव्या संधींची ओळख व्हावी, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा कॉन्क्लेव्ह महत्त्वाचा ठरणार आहे.
09 Mar 2026 06:15 PM (IST)
Ajit Pawar Plane Crash : बारामती : जानेवारी महिन्यामध्ये दिवंगत नेते अजित पवार यांचे अपघाती निधन (Ajit Pawar Plane Crash) झाले. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचे देखील निधन झाले. माळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अजूनही हे कुटुंब धक्क्यातून सावरलेले नाही. मात्र माळी कुटुंबाला धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दावा केला आहे.
09 Mar 2026 06:07 PM (IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि केंद्र सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष आता राष्ट्रपतींच्या सन्मानापर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला असून, ३१ मार्च २०२४ रोजीचा एक जुना फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या फोटोवरून सुरू झालेल्या वादाला आता भाजपने ‘फॅक्ट-चेक’द्वारे उत्तर दिले आहे.
09 Mar 2026 06:01 PM (IST)
मुंबई: जबाबदार गतीशीलता प्रमुख म्हणून आपली भूमिका अधिक दृढ करत किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास प्रीमियम कारमेकर कंपनीने रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या (एमओआरटीएच) आश्रयांतर्गत द सोशल लॅब फाऊंडेशन (टीएसएल)सोबत सहयोगाने आपला प्रमुख रस्ता सुरक्षा उपक्रम 'बकल अप'च्या लाँचची (Automobile News) घोषणा केली. या पुढील टप्प्यानिमित्त किया इंडिया आणि टीएसएलने या उपक्रमाची अधिक पोहोच व प्रभावासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. नवी दिल्लीमधील ट्रान्सपोर्ट भवन येथे एमओआरटीएचचे माननीय राज्यमंत्री अजय टम्टा यांच्या हस्ते फेज २ चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि किया इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
09 Mar 2026 05:49 PM (IST)
बॉलीवूड स्टार रणबीर कपूरच्या आगामी “रामायण: द इंट्रोडक्शन” या चित्रपटाने बरीच चर्चा रंगवली आहे. लोक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात साउथचे सुपरस्टार साई पल्लवी आणि यश देखील दिसणार असून सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत आणि साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहेत. हे फोटो समोर येताच चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली. आता, टीव्ही अभिनेता आशिष शर्माने या फोटोंच्या सत्यतेबद्दल भाष्य केले आहे.
09 Mar 2026 05:18 PM (IST)
राज्यात सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीप्रकरणांवर कडक कारवाई करण्यात आली असून एकूण ८१ जणांना निलंबित करण्यात आले आहे. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षांमध्ये विविध केंद्रांवर सामूहिक कॉपीप्रकरणे उघडकीस आल्याने मंडळाने ही कारवाई केली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना मदत केल्याचा आरोप असल्याने काही पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
09 Mar 2026 05:12 PM (IST)
शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिक, व्यापाऱ्यांकडे दररोज हजारो लिटर कूल पाणी पुरविले जाते. पण, हे पाणी कितपत शुद्ध आहे, स्वच्छ आहे, हे ओळखण्यासाठी ना या व्यापाऱ्यांकडे कोणती यंत्रणा आहे, ना शासन प्रशासनाकडे. तब्बल कोट्यावधीची उलाढाल असलेल्या आणि सुमारे हजारो लोकांना रोजगार देणारी ही व्यवस्था अनियंत्रितच आहे. गोंदिया शहरात मंगल कार्यालयांपासून ते शासकीय, निमशासकीय कार्यालयापर्यंत कुलजारमधून पाणीपुरवठा होतो. रोजच्या रोज लाखो गोंदियाकर हे पाणी पितात. टेम्पोमध्ये कुलजार भरून त्यांची वाहतुक करतानाचे चित्र आपण दररोज रस्त्यांवर बघतो. पण, हे पाणी कुठे भरतात, ते कसे भरतात, त्याची गुणवत्ता काय, या प्रश्नांचे उत्तर सद्या शासकीय यंत्रणेकडे नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
09 Mar 2026 04:50 PM (IST)
छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. ४३४ वी रँक मिळवून प्रशासकीय सेवेचे आई वडिलांचे स्वप्न त्याने साकार केले आहे.
09 Mar 2026 04:45 PM (IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम MIDC मधील डॉक्टर खान इंडस्ट्रियल कन्सल्टंट कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापक, प्लांट इन्चार्ज तसेच कंपनी व्यवस्थापनातील इतर अधिकाऱ्यांविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण स्फोटात एकूण ११ कामगार जखमी झाले होते. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नवी मुंबई येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लोटे MIDC परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
09 Mar 2026 04:40 PM (IST)
वसई-विरारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून आगरी सेनेत फूट पडत जयेश पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार, हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडी (बविआ) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा विवा कॉलेज येथे पार पडला. विशेष म्हणजे, जयेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच आगरी सेनेच्या पालघर जिल्हा प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता.
09 Mar 2026 04:35 PM (IST)
कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर भूमाफिया आणि बिल्डरांनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. तक्रारदार नागरिकांनी थेट म्हैस घेऊन केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयात धडक देत प्रशासनाला निवेदन दिले.या वेळी आंदोलकांनी म्हैस कार्यालयाबाहेर उभी करून निषेध व्यक्त केला. द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमाफिया आणि बिल्डरांनी सुमारे ७० ते ८० अनधिकृत चाळी उभारल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या अतिक्रमणामुळे गुरे चारण्यासाठी असलेली मोकळी जागा पूर्णपणे नष्ट झाल्याचेही नागरिकांनी सांगितले.
09 Mar 2026 04:30 PM (IST)
पालघरमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडून निधीअभावी अनेक योजनांची बिले थकीत राहिली असून विविध कारणांमुळे कंत्राटदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
09 Mar 2026 04:20 PM (IST)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा, तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि नातेसंबंधांच्या स्थितीमुळे जास्त चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांत मलायकाचे नाव हिरे व्यापारी हर्ष मेहता याच्याशी जोडले गेले आहे, परंतु अलीकडेच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे लोक थोडे गोंधळले आहेत. एका पार्टीमधून मलायका अरोराचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती एका पुरूषासोबत नाचताना दिसत आहे. हर्ष मेहता पार्टीतून गायब होता असे नाही, तर मलायका दुसऱ्या कोणासोबत दिसल्याने चाहते अंदाज लावत आहेत.
09 Mar 2026 04:15 PM (IST)
पुण्यातील वारजे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याच कारण ही तेवढंच धक्कादायक आहे. एका विवाहित पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या नंतर हे प्रकरण उघडकीस आल आहे. सासरच्या लोकांकडून तिचा सातत्याने मानसिक छळ केला जायचा आणि तिला गर्भपाताच्या गोळ्या देवून तिचा गर्भपात केल्याची तक्रार तिने पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणात रामनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू , दीर आणि जावयांकडून तिचा सातत्याने छळ केला जायचा अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार महिलेच ८ डिसेंबर २०१९ साली लग्न झाल होत. अमित शिंदे अस त्या पतीच नाव आहे. मात्र इतर समारंभात सासरच्या लोकांना योग्य मान सन्मान मिळत नाही म्हणून तिचा छळ सुरू केल्याची आणि महागड्या वस्तू घेवून ये म्हणून दबाव टाकल्याच म्हटला आहे.
09 Mar 2026 04:10 PM (IST)
रायगड जिल्ह्यात आज 9 मार्च रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे तसेच पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी 8 मार्चच्या संध्याकाळपासून महाड येथील हॉटेल विसावा येथे दाखल झाले होते. आज सकाळी राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर ते पुन्हा किल्ल्याच्या पायथ्याशी आले आणि तेथे मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः सदस्यता अर्ज भरत किल्ले रायगडावरून मनसेच्या सदस्यता नोंदणी मोहिमेची सुरुवात केली.
09 Mar 2026 04:05 PM (IST)
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्याचा दिवसाभराचा संपूर्ण कारभार महिला पोलिसांच्या हाती देण्यात आला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांनी तक्रारी स्वीकारणे, नागरिकांशी संवाद साधणे तसेच विविध प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील सर्व कामकाज महिला पोलिसांकडून प्रभावीपणे पार पाडण्यात आले.
09 Mar 2026 03:55 PM (IST)
नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी कुणबी नोंदी आणि ओबीसी प्रमाणपत्रांच्या आकडेवारीबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत सातत्य नसल्याने मराठा आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. जानेवारी 2024 मध्ये 57 लाख 41 हजार 239 नोंदी सापडल्याचे सांगितले गेले, त्यानंतर 38 लाख 97 हजार 391 प्रमाणपत्रे देण्यात आली. पुढे 1 लाख 71 हजार प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता 48 लाख नोंदी आणि 12 लाख प्रमाणपत्रांची नवीन आकडेवारी समोर येत असल्याने ही माहिती कुठून आली याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तायवाडे यांनी सांगितले की, या नोंदी जुन्याच असून ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही. मात्र सरकारकडून चुकीची किंवा विसंगत आकडेवारी दिल्याने समाजात गोंधळ निर्माण होत आहे. त
09 Mar 2026 03:50 PM (IST)
कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा परिसरातील गौचरण जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याच्या आरोप करत स्थानिक थेट म्हैस घेऊन केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयात पोहचले आहेत.
09 Mar 2026 03:45 PM (IST)
वसई-विरारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून आगरी सेनेत फूट पडत जयेश पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार, हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडी (बविआ) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा विवा कॉलेज येथे पार पडला. विशेष म्हणजे, जयेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच आगरी सेनेच्या पालघर जिल्हा प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता.
09 Mar 2026 03:40 PM (IST)
मिरज येथील, शासकीय मेडिकल कॉलेज व रूग्णालय, मिरज तसेच संलग्न शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 107 कंत्राटी सफाई कामगारांना कर्मचारी राज्य विमा (ESI) योजनेपासून अनेक वर्षांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कामगारांच्या पगारातून ESI साठी नियमित कपात केली जात असल्याचा असतानाही आजपर्यंत त्यांना ESI कार्ड, विमा क्रमांक अथवा कोणतीही वैद्यकीय सुविधा देण्यात आलेली नाही. सदर कामगार क्रिस्टल या कंत्राटदार कंपनीमार्फत कार्यरत असून , ते दररोज रुग्णालयातील संसर्गजन्य कचरा, घाण आणि धोकादायक वातावरणात काम करत असून कोविड महामारीच्या काळातही त्यांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली. मात्र एवढ्या जोखमीच्या कामानंतरही त्यांना आजपर्यंत कोणतेही सामाजिक सुरक्षा संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतलाय.
09 Mar 2026 03:35 PM (IST)
जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पालघर जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. इशारा दिला आहे. शासनाकडून निधीअभावी अनेक योजनांची बिले थकीत राहिली असून विविध कारणांमुळे कंत्राटदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. आपल्या प्रमुख मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.
09 Mar 2026 03:35 PM (IST)
नालासोपारा पूर्व येथील सोपारा फाटा परिसरातील चॅम्पियन कंपाउंडमधील एका प्लास्टिक कंपनीला आज दुपारी सुमारे ११:४५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.आगीची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने काही प्रमाणात वेग घेतल्याचे सांगितले जात आहे.
09 Mar 2026 03:30 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर: प्लॉट व्यवहाराच्या नावाखाली सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाला सहा जणांनी तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. प्लॉट विक्रीचे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळली, त्यानंतर नोंदणीकृत खरेदीखत न करता टाळाटाळ, बाऊन्स झालेले धनादेश, जीपीए व बनावट करारनाम्यांच्या आधारे फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान दिल्ली गेट परिसरातील सलमान हॉल येथे घडला.
09 Mar 2026 03:20 PM (IST)
देशाच्या पाठीवर कुठेही जा पण North Korea फिरण्याचा विचार करत आहात तर आधी त्या देशाचा अभ्यास करून जा. अभ्यास कराल तर स्वतःच म्हणाल, “नको रे बाबा North Korea! कोणत्या तरी दुसऱ्या देशात फिरू.” येथे राहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या तोंडच पाणी पळालंय, त्यात तुम्ही तिथे जाण्याचा विचार तरी करत असाल तर तुम्ही “आ बैल मुझे मार!” करणार आहात. का असं? कारण त्या देशाचा शासक आहे ‘Kim Jong un’! एक असा शासक ज्याचे नियम यमसदनालाही लाजवतील.
09 Mar 2026 03:08 PM (IST)
तेलंगणा: तेलंगणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी आपल्याच पोटच्या तीन अल्पवयीन मुलींची निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. रविवारी पोलिसांनी आरोपीला ऑटो-रिक्षा चालकाला अटक केली होती. त्याने आपल्या मुलींना तलावात बुडवून मारल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने तेलंगणा हादरून गेले.
6 मार्च रोजी आरोपी ऑटो चालक आणि त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली, त्याच्या 8, 6 आणि 5 वर्षांच्या तीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ शोधायला सुरुवात केली. मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक रहिवाशांची चौकशी केली आणि मुलींचे फोटो सोशल मिडिया आणि मेसेंजिग अॅपवर शेअर केले होते.
09 Mar 2026 02:50 PM (IST)
दक्षिणेचा सुपरस्टार थलापती विजयचे चाहते त्याच्या बहुप्रतिक्षित "जना नायगन" चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार होता परंतु चित्रपटाची रिलीज डेट वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. ताज्या माहितीनुसार, विजयच्या चित्रपटाचे प्रदर्शन आणखी लांबणीवर पडू शकते असे वृत्त आहे.
09 Mar 2026 02:45 PM (IST)
Bangladesh Energy Crisis 2026 : मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल (US-Israel Iran War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगाचे अर्थकारण ढवळून निघाले आहे. याचे सर्वात मोठे आणि भीषण चटके आता भारताच्या शेजारील देश ‘बांगलादेश'(Bangladesh) ला बसू लागले आहेत. बांगलादेशमध्ये ऊर्जेचे एवढे मोठे संकट उभे राहिले आहे की, सरकारने सोमवारपासून देशातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी विद्यापीठे बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ सुट्टीसाठी नसून, देशातील वीज आणि इंधनाची बचत करण्यासाठी घेतलेला एक आपत्कालीन उपाय आहे.
09 Mar 2026 02:40 PM (IST)
महाभारताच्या महाकाव्यात्मक युद्धात, भीष्म पितामह यांचे नाव श्रद्धेने आणि भक्तीने घेतले जाते. ते केवळ हस्तिनापूरचे रक्षक नव्हते तर धार्मिकता आणि सत्याचे प्रतीक देखील होते. तुम्हाला माहिती आहे का की भीष्म पितामह यांचे जीवन सामान्य माणसासारखे नव्हते, तर ते शाप आणि आशीर्वादांच्या चक्रात अडकले होते. जिथे एका शापाने भीष्मांच्या जीवनाची दिशा बदलली. महाभारतामधील कोणता योद्ध्याचा शाप त्याच्या जीवनातील मोठे वरदान ठरले ते जाणून घ्या
09 Mar 2026 02:30 PM (IST)
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मनेरमळा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहे.
09 Mar 2026 02:20 PM (IST)
बॉलीवूड स्टार्सच्या घरांवर अलिकडेच झालेल्या गोळीबारानंतर, आता हॉलिवूड स्टारच्या घरीही अशीच एक घटना घडल्याचे वृत्त आहे. लोकप्रिय हॉलिवूड गायिका रिहानाच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. पॉप स्टारच्या बेव्हरली हिल्स येथील घराबाहेर एका महिलेने अनेक गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. गोळी भिंतीवरून गेल्याचे वृत्त आहे. या धक्कादायक प्रकार समोर आल्याबरोबरच गायिकेचे चाहते देखील चिंता व्यक्त करत आहेत.
09 Mar 2026 02:15 PM (IST)
उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावर सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांचा बारामतीत झालेला विमान अपघात होता की घातपात होता, यावरून राज्यात राजकीय प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यावरून राजकारणही तापलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह आमदार अमोल मिटकरी हेदेखील संशय व्यक्त करत आहेत. हे सगळं सुरू असतानाच एक अंतर्गत बाब समोर आली आहे. दिवंगत अजित यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
09 Mar 2026 02:10 PM (IST)
19th Ramadan Significance Iran 2026 : इराणमध्ये (Iran) एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांची देशाचे तिसरे ‘सुप्रीम लीडर’ म्हणून निवड करण्यात आली. मात्र, या राजकीय घोषणेपेक्षा चर्चा रंगली आहे ती या घोषणेच्या वेळेची. इराण सरकारने ही घोषणा करण्यासाठी रमजान महिन्याचा १९ वा दिवस का निवडला? यामागे केवळ राजकारण नसून खोलवर रुजलेली इस्लामिक श्रद्धा आणि इतिहास दडलेला आहे.
09 Mar 2026 02:03 PM (IST)
राजधानी दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीमध्ये एका बसने अनेकांना उडवल्याची घटना समोर आली आहे. डिटीसीची बस जी अत्यंत वेगाने जात होती त्या बसने अनेकांना धडक दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन लोकांचा जागेवरच मृत्यू झाला.
09 Mar 2026 01:55 PM (IST)
आष्टी नगरपंचायत, पाटोदा आणि नगरपंचायत शिरूर कासार या तीन नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत आ. सुरेश धस यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व सांगितले. बैठकीत तीनही नग्रपंचायतींमधील सध्या सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती तपासली. यामध्ये पाणीपुरवठा, नळजोडणी, पाणी टाक्या, फिल्टर युनिट, उपलब्ध पाणीसाठा आणि शहरांमध्ये सध्या मिळणारा पाणीपुरवठा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
09 Mar 2026 01:45 PM (IST)
भारतातील आघाडीच्या तीन ऑनलाइन अन्न वितरण कंपन्या स्विगी, मॅजिकपिन आणि झोमॅटो यांनी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा वाढीला वेग आला आहे. उद्योग अधिकाऱ्यांनी सांगितले की, सणासुदीची मागणी, परवडणाऱ्या ऑफर्स आणि वाढत्या वापरकर्त्यांच्या आधारामुळे ऑर्डरमध्ये वाढ झाली आहे. मार्केटिंग, उत्पादन नवोन्मेष आणि मूल्य-चालित ऑफरिंगमध्ये सतत गुंतवणूक केल्याने, येत्या तिमाहीत या क्षेत्राची वाढीची गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. मॅजिकपिनचे संस्थापक आणि सीईओ अंशु शर्मा यांनी सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर हे महिने आमच्यासाठी अतिशय चांगले राहिले आहेत.
09 Mar 2026 01:35 PM (IST)
मध्य आशियातील राजकारणात एक मोठी उलथापालथ सुरु आहे. सोव्हिएत युनियनच्या अविभाज्य भाग असलेल्या देशांवर आता रशियाची पकड सुटताना दिसत आहे. या संधीचा फायदा चीनने घेतला असून केवळ युरोपच नव्हे, तर मध्य आशियातील सीमकरणेही बदलली आहे. यामुळे रशियाचा मध्य आशियातील प्रभावाल धक्का पोहचलो असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची टेन्शन वाढले आहे.
09 Mar 2026 01:30 PM (IST)
आता उन्हाळा तापू लागला असून कॅनच्या पाण्याचा धंदाही तेजीत आला आहे. पण शहरात दररोज कॅनद्वारे विक्री होणाऱ्या थंडगार पाण्याच्या शुद्धतेची शाश्वती कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ उन्हाळाच नव्हेतर शहरात वर्षभर पाणी विकत घेण्याचा ट्रेंड आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.जमिनीतून पाणी उपसा करून त्याचा कॅनद्वारे पुरवठा करणारे व्यावसायिक आता चौका चौकात प्लँट सुरू करून बसलेले आहेत. पण या व्यापारावर नियंत्रण कोण ठेवणार याची प्रशासनातच स्पष्टता नाही. अशा प्लॅटवर कारवाईचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन, नगर परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत.
09 Mar 2026 01:25 PM (IST)
मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांच्या कार्यकाळात वैयक्तिक कामगिरी साजरी केली जाणार नाही. या तत्त्वाची नवीनतम झलक रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करून तिसरा टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा दिसून आली. आयसीसी ग्लोबल फायनलमध्ये दोनदा आपल्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या गंभीरने जोर देऊन सांगितले की, “मला वाटते की सूर्या (India’s T20 captain Suryakumar Yadav) यांच्यासोबत माझे सामान्य तत्वज्ञान नेहमीच असे राहिले आहे की यश महत्त्वाचे नसते. ट्रॉफी महत्त्वाची नसतात.
09 Mar 2026 01:16 PM (IST)
Motorola लवकरच त्यांचा नेक्स्ट-जनरेशन Razr 70 लाँच करण्याची तयारी करत आहे. हा नवा फोन फोल्डेबल असणार आहे. अलिकडच्या अहवालांनुसार हा नवीन फोन पुढील महिन्याच्या सुरुवातीला लाँच होऊ शकतो. फोनबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. पण हा येणारा Motorola Razr 70 चीनच्या TENAA सर्टिफिकेशन साइटवर आधारीत आहे. नुकतीच यासर्व संबंधीत नवीन फोल्डेबल डिव्हाइसची महत्त्वाची समोर आली आहे.
09 Mar 2026 01:05 PM (IST)
मध्यपूर्वेतील (US-Israel Iran War) परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. एकीकडे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये रक्ताचा सडा पडत असताना, दुसरीकडे इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष एका नव्या वळणावर आला आहे. जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी अमेरिकेची ‘पॅट्रियट’ (US Patriot System Fail) हवाई संरक्षण प्रणाली इराकच्या काही भागांत ड्रोन हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याचे वृत्त समोर आले आहे. या बिघडत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मोठी माहिती दिली असून, आतापर्यंत ६७,००० भारतीय नागरिकांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढले आहे.
09 Mar 2026 01:00 PM (IST)
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाने (US-Israel VS Iran) भयंकर रुप धारण केले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून दोन्ही बाजूंनी सतत हल्ले होत आहेत. मात्र या हल्ल्याचा फटका मध्यपूर्वेतील सामान्य नागरिकांना बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये सध्या 1,332 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इस्रायलने लेबनॉनवरही हल्ला केला आहे. या हल्ल्यातही लहान महिला आणि मुलांसह शेकडो लोक मृत्यमूखी पडले आहेत.
09 Mar 2026 12:55 PM (IST)
किरकोळ वादातून आयटी इंजिनीअर असलेल्या जुळ्या भावाने आपल्या बहिणीची चाकूने हत्या केली. त्यानंतर आईवरही जीवघेणा हल्ला केला. जखमी आईवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी फरार आहे.
09 Mar 2026 12:50 PM (IST)
सोशल मीडियावर एक अत्यंत गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उझबेकिस्तानमधील असून तेथील चिमुरड्यांनी बॉलीवूड गाण्यावर रंगीबेरंगी कपडे परिधान करुन भन्नाट असा डान्स केला आहे. हा व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस पडत आहे.
09 Mar 2026 12:50 PM (IST)
सध्या संपूर्ण मध्यपूर्व युद्धाच्या (US-Israel Iran War) ज्वाळांमध्ये होरपळून निघत आहे. हजारो निष्पाप लोकांचा बळी जात आहे आणि शांततेची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. इराणसाठी हा काळ त्यांच्या इतिहासातील सर्वात ‘काळा कालखंड’ मानला जात आहे, कारण अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांमध्ये इराणने आपले सर्वोच्च नेते अली खामेनी यांना गमावले आहे. इराण हा चीनचा अत्यंत जवळचा मित्र देश आहे, तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन या वर्षाला स्वतःसाठी आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांसाठी “ऐतिहासिक आणि महत्त्वाचे वर्ष” म्हणून संबोधत आहे.
09 Mar 2026 12:45 PM (IST)
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला आणि ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक सामन्यामध्ये भारताच्या संघाने रेकाॅर्ड ब्रेकींग कामगिरी केली आहे. सुरुवातीला, या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. नंतर, गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत न्यूझीलंडला हरवले. सामन्यादरम्यान अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेलमध्ये जोरदार वाद झाला असला तरी, सामन्यानंतर अर्शदीप सिंगने मिशेलची माफी मागितली, ज्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
09 Mar 2026 12:40 PM (IST)
फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. या दिवशी पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक या सोहळ्यास उपस्थित असतात. तीन दिवस होणाऱ्या सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
09 Mar 2026 12:35 PM (IST)
जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपटाला महाराष्ट्रात प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत असून प्रेक्षकांच्या भावना पाहून कलाकारही भारावून जात आहेत. आई-मुलींच्या नात्यातील आणि स्त्रीमनातील न बोललेल्या भावनांवर आधारित या कथेशी प्रेक्षक वेगवेगळ्या पातळीवर जोडले जात आहेत. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत असून थिएटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. चित्रपट पाहाताना प्रेक्षक पूर्णपणे कथेत गुंतून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
09 Mar 2026 12:30 PM (IST)
सूर्याच्या नेतृत्वाखाली, टीम इंडिया यजमान म्हणून टी-२० विश्वचषक जिंकणारा आणि तीनदा ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनला. या विजयानंतर स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याची मैत्रीण महिका शर्माला दिले.
09 Mar 2026 12:25 PM (IST)
संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवलेल्या माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या ‘फ़ॉर स्टार्स ऑफ़ डेस्टिनी’ यांचे पुस्तक दाखवल्याने वाद निर्माण झाला. आता इराण – इस्रायल युद्धाचा (Iran-Israel war) भडका उडाला असताना भारताचे संसदीय अधिवेशन सुरु आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशनामध्ये या युद्धाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील तेल साठे, गॅस साठे यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.