प्रमोद आहेर, श्रीगोंदा : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह.साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण ( Ex Sugar Commissioner Rajendra Chavan)व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार यांच्या शुभहस्ते, कुकडी व श्रीगोंदा कारखान्याचे संचालक नारायण पाटील जगताप व कारखान्याच्ये अध्यक्ष तथा जिल्हा मध्य. सहकारी बॅंकेचे संचालक व माजी आमदार राहुल जगताप यांचे अध्यक्षतेखाली तर गव्हान विधीवत पुजन संचालक संभाजी देविकर, मोहनराव आढाव, सुभाषराव राक्षे, मनोहर शिंदे, संपत कोळपे यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी, उपाध्यक्ष विवेक पवार, संचालिका डॉ. प्रणोती जगताप, ओम गुरुदेव महिला बिगरशेती पतसंस्थेच्या संस्थापक अनुराधा जगताप, उपाध्यक्ष विश्वास थोरात, सरपंच सुर्यजीत पवार, अँड. निवृत्ती वाखारे, कचरुजी मोरे, प्रमोद इथापे, मच्छिंद्र नलगे, जालिंदर निंभोरे, अशोक शितोळे, आबासाहेब शिंदे, अनिता लगड, विमल मांडगे, अशोकर वाखारे, बाळासाहेब उगले, मोहन कुंदाडे, रभाजी कातोरे, बापुराव भुजबळ, नितीन डुबल, भिंताडे साहेब, विक्रम पंदरकर, संदित तरटे, कार्यकारी संचालक डि.एन. मरकड तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण म्हणाले, एका साखर कारखान्यामुळे २५ किलोमीटरचा परिसर समृद्ध व संपन्न होतो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो व आर्थिक विकासाला चालना मिळते. साखर कारखानादारीकडे सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहने गरजेचे आहे. फक्त साखर उत्पादन करुन चालणार नाही त्यासोबत इथेनॉल, आसवानी प्रकल्प, सहविजनिर्मीती प्रकल्प उभारणे आवश्यक आहेत. तर शेतकऱ्यांना जास्तीचा ऊसभाव देणे शक्य होणार आहे. खर्चाच्या तुलनेत साखरेला आवश्यक बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शासनाने खाखर उद्योगाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. घनश्याम शेलार म्हणाले साखर कारखानदारांनकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. चांगला ऊसभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे परंतू शासनाचे साखर बाबतचे धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आहे. साखरेला चांगला बाजारभाव मिळाला व साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष दिले तर शेतकऱ्यांना चांगला ऊसभाव देता येणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक डि.एन. मरकड यांनी साखर कारखाना व साखर धंद्यातील अडचणींची पार्श्वभूमी मांडली.
कारखाना शासनाच्या धोरणानुसार वेळेत चालू होणार आहे. यावर्षी कारखान्याने १० लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्टे ठेवले आहे. कामगारांची दिवाळी गोड केली जाणार आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप यांनी केले. विवेक पवार यांनी सुत्रसंचालन केले तर मोहनराव आढाव यांनी आभार व्यक्त केले.