Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंचगंगा नदीत सापडली आधार कार्ड; काेल्हापूर जिल्ह्यात माेठे रॅकेट सक्रीय असल्याची चर्चा

शासकीय योजनांसाठी महत्वाचा दस्तावेज असलेल्या आधार कार्ड (Adhar Card) आणि रेशनकार्डचा (Reshan Card) गैरवापर किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे, याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यात आला आहे. इचलकरंजीमध्ये नदी पात्राची स्वच्छता करताना तब्बल एक पोतं भरुन आधार कार्ड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2023 | 05:08 PM
पंचगंगा नदीत सापडली आधार कार्ड; काेल्हापूर जिल्ह्यात माेठे रॅकेट सक्रीय असल्याची चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : शासकीय योजनांसाठी महत्वाचा दस्तावेज असलेल्या आधार कार्ड (Adhar Card) आणि रेशनकार्डचा (Reshan Card) गैरवापर किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे, याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यात आला आहे. इचलकरंजीमध्ये नदी पात्राची स्वच्छता करताना तब्बल एक पोतं भरुन आधार कार्ड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दीड महिन्यांमध्ये हजारो रेशन कार्डचा ढीग सापडल्यानंतर आता आधारकार्ड सापडल्याने यामध्ये मोठं रॅकेट आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे. रविवारी आधार कार्डचा गंभीर प्रकार आढळून आला. आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचे वय साधारण ६० ते ६५ वयापर्यंत आहे. त्यामुळे पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकारही सुरु आहेत. त्यासाठी हा प्रकार सुरु आहे का? अशीही चर्चा आहे.

राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना पोतं सापडलं

पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना हे पोतं तरंगताना दिसल्याने बाहेर काढले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नदीत सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेली सर्व आधार कार्ड इचलकरंजी शहर आणि परिसरातील असल्याचे समजते. इचलकरंजी परिसरात आधार कार्ड आणि रेशन कार्डचा ढीग सापडत चालल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आधार कार्ड तयार करणाऱ्यांची चाैकशी

आधार कार्ड बाहेर काढल्यानंतर सर्व ओरिजिनल असल्याचे समजते. इचलकरंजी शहरासह जवाहरनगर, कोरोची, कबनूर भागातील आहेत. आधार कार्डवरुन काहींना संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी ती आपल्याकडेच सांगितले. दरम्यान, आधार कार्ड तयार करण्याची काही नावे समोर आली असून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे. या संदर्भातील अहवाल तहसीलदारांना पाठवण्यात येणार आहे.

बनावट कार्डने अल्पवयीन मुलीची प्रसुती

दरम्यान, कसबा बावड्यामध्ये झालेल्या प्रसूतीमध्ये मुलीच्या पालकांनी बोगस आधार कार्डचा वापर करून प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाईल्ड लाईन व जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभागाने हा प्रकार उघडकीस आणला. ही मुलगी सध्या १५ वर्षे ७ महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ती मुलगी साडेतेरा वर्षाची असताना तिचा विवाह झाल्याचे समोर आलं आहे. मुलीच्या आईने तिचा विवाह मंगसुळी या ठिकाणी लावून दिला होता, अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे मजुरीसाठी गिरगावमध्ये आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन विवाहितेची प्रसूती झाली होती. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Aadhaar card found in panchganga river it is discussed that methe racket is active in kolhapur district nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2023 | 05:08 PM

Topics:  

  • aadhar card
  • cmomaharashtra
  • In Kolhapur
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन
3

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत
4

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.