Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पालिकेचा आस्थापना खर्च हा एकूण उत्पन्नाच्या ६५.६ टक्के एवढा आहे. अशात या सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेतल्यास पालिकेवर दरमहा अतिरिक्त १० कोटी ४० लाखांचा बोजा पडेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 11, 2026 | 07:19 AM
Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Follow Us
Follow Us:

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या दहा वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे दिले. यासंदर्भात शासनाने नियमानुसार ही पदे भरण्याचे निर्देश त्यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज यांना दिले.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेमध्ये एकूण ११९८ कर्मचारी सेवेत सामावून घेण्याबाबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, नगरविकास अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज, सांगली कुपवाड मनपाच्या आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

सांगली मिरज कुपवाड मनपामधील या ११९८ कर्मचाऱ्यापैकी काही कर्मचारी मानधनावर तर काही रोजंदारीवर काम करत आहेत. यातील काही कर्मचारी हे २५ ते ३० वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना आता पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी पालकमंत्री पाटील, आमदार बाबर यांनी केली होती.

सद्यस्थितीत पालिकेचा आस्थापना खर्च हा एकूण उत्पन्नाच्या ६५.६ टक्के एवढा आहे. अशात या सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेतल्यास पालिकेवर दरमहा अतिरिक्त १० कोटी ४० लाखांचा बोजा पडेल. त्यामुळे सर्वांना सामावून घेतल्यास पालिकेवर पडणारा बोजा टाळण्यासाठी सध्या १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूर्तास पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत नंतर निर्णय घ्यावा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत

तसेच पालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, मालमत्ता कर वसूल करावा, त्यात नवीन मालमत्तांचा समावेश करावा, असे उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. पालिका प्रशासनाकडून उत्पन्न वाढीचे प्रयत्न चालू असून, त्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. त्यातून आगामी काळात पालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न जमा होईल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

Web Title: Absorb municipal corporation employees with over ten years of service into permanent employment says eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 07:04 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Municipal Corporation
  • sangli news

संबंधित बातम्या

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग
1

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

‘जवान सीमेवर रक्त सांडतोय; महाराष्ट्र रक्तदानातून त्यांच्या पाठीशी उभा’; एकनाथ शिंदेंचा दिल्लीतील संदेश
2

‘जवान सीमेवर रक्त सांडतोय; महाराष्ट्र रक्तदानातून त्यांच्या पाठीशी उभा’; एकनाथ शिंदेंचा दिल्लीतील संदेश

राज ठाकरेंच्या ‘तिसऱ्या मुंबई’वरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; ‘काय करायचं हे ठरलंय, नियोजनही सुरू’
3

राज ठाकरेंच्या ‘तिसऱ्या मुंबई’वरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; ‘काय करायचं हे ठरलंय, नियोजनही सुरू’

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
4

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.