
एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली
Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
एसी लोकल थांबली की साधी लोकल सिग्नलवर
गर्दीच्या वेळेत एसी लोकलच्या दरवाजांजवळ प्रवाशांची गर्दी होते. दरवाजाच्या मार्गात प्रवासी असल्यास सेन्सरमुळे तो बंद होत नाही. दरवाजे पूर्णपणे बंद होईपर्यंत लोकल फलाटावर थांबवावी लागते. एसी लोकलचा हा अतिरिक्त थांबा मागून येणाऱ्या साध्य लोकलसाठी अडथळा ठरतो. सिग्नल न मिळाल्याने साध्या लोकलला फलाटाबाहेर किंवा सिग्नलजवळ थांबावे लागते.
अनेक साध्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणामाची शक्यता
गर्दीच्या वेळेत दोन लोकलमधील अंतर कमी असल्याने काही सेकंदांचा विलंबही पुढील सेवेपर्यंत पोहोचतो. मागील साधी लोकल उशिरा धावू लागल्यास तिच्यामागील लोकलनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे एका एसी लोकलच्या दरवाजा बंद होण्याच्या विलंबाची परिणती अनेक साध्या लोकलच्या वेळापत्रकावर होऊ शकते.
Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह
गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आवश्यक
एसी लोकलमधील स्वयंचलित दरवाजे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे आहेत. मात्र, गर्दीच्या वेळेत दरवाजांजवळ होणारी गर्दी आणि त्यामुळे वाढणारा थांबा हा परिचालनासाठी अडथळा ठरत आहे. एसी लोकलची सुविधा देताना त्याच मार्गावरील मोठ्या संख्येने प्रवाशांना सेवा देणाऱ्या साध्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: सकाळच्या गर्दीच्या वेळेत साध्या लोकलच्या फेऱ्यांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी एसी लोकलच्या दरवाजांजवळील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि लोकल वेळेत रवाना होण्यासाठी आवश्यक परिचालनात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)