फोटो सौजन्य AI
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात गेल्यावेळी मिळालेले मताधिक्यापेक्षा गळालेल्या मतदारांची संख्या चौपट आहे. २०२४ मध्ये फडणवीस यांनी प्रतिस्पधीं काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा ३९,७१० मतांनी पराभव केला. एसआयआरमध्ये त्यांच्या मतदारसंघात १,५४,००५ मतदार यादीतूनच बाहेर पडले आहे.
सहाही विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या २४,४७,८८२ आहे. त्यापैकी ९,२२,६७८ मतदारांना वगळले आहे. इतर राज्यांमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या संख्येवरून भाजपवर विरोधकांनी निशाना साधला होता. आता महाराष्ट्रातही असाच सूर आळवला जाईल. सहा मतदारसंघांमध्ये ३७ ते ४० टक्के मतदारांना वगळले आहे. यात निश्चितच गोंधळ झाला आहे. सर्व पक्ष वगळलेल्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील.
Nagpur Airport : १.५० लाख टनांचे लक्ष्य गाठणार कसे? कार्गो घटल्याने जीएमआरच्या योजनेसमोर मोठे आव्हान
काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूर मतदारसंघात ४०.२१ टक्के मतदार वगळले, गेल्या निवडणुकीत त्यांना १,०४,१४४ मते मिळाली होती तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना ९८.३२० मते मिळाली होती, ठाकरे यांचा विजयाचा फरक केवळ ५,८२४ मतांचा होता.
या मतदारसंघातील एकूण ३,९९,३७१ मतदारांपैकी तब्बल १,६०,५७१ मतदार गायय आहेत. अशीच परिस्थिती काँग्रेस आमदार नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघातही आहे. या मतदारसंघातून वगळलेल्या मतदारांची सर्वाधिक संख्या १,६५,४८५ आहे. गेल्या निवडणुकीत राऊत यांना १,२७,८७७ मते मिळाली होती.
त्यानी भाजपचे मिलिंद माने यांचा २८,४६७ मतांच्या फरकाने पराभव केला होता. १.६५ लाख मतदारांचे नाव वगळल्याने कोणत्याही निवडणुकीच्या निकालावर निश्चितच परिणाम होऊ शकतो.
आमदार मोहन मते यांच्या दक्षिण नागपूर मतदारसंघात १,५३,२२३ मतदार वगळले आहेत, मते यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा १५,६५८ मतांनी पराभव केला होता, त्यांना १,१७,५२६ मते मिळाली तर पांडव यांना १,०१,८६८ मते मिळाली. यादीतून वगळलेल्या मतदारांची संख्या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा खूप जास्त आहे.
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूर मतदारसंघातही एकूण ४.३२ लाख मतदारापैकी १,५७,८८६ मतदार यादीतून गळाले आहेत. मागील निवडणुकीत खोपडे यांना १,६३,३९० मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस/सपा पक्षाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांना केवळ ४८,१०२ मते मिळाली. खोपडे यांच्या विजयाचे अंतर १,१५.२८८ मतांचे होते.
Nagpur News : नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क
मध्य नागपूर मतदारसंघातील एकूण ३,४५,९५३ मतदारांपैकी १,३१,५०८ म्हणजेच ३८.०१ टक्के मतदार यादीतून वगळले आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे प्रवीण दटके यांनी काँग्रेसचे बंटी शेळके यांचा ११.६३२ मतांनी पराभव करीत ९०,५६० मते मिळवली होती, एवढ्या मोठ्या संख्येने नावे वगळल्यामुळे येत्या महिन्यात राजकीय पक्ष शक्य तितके मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी चढाओढ करण्याची शक्यता आहे.






