Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर 5 जण गंभीर

जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2025 | 10:44 AM
धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात

धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात

Follow Us
Close
Follow Us:

जालना : जालनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जालन्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. रविवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये जी. रामू (वय ४५) आणि जी. माधुरी (वय ४०) या दाम्पत्याचा समावेश आहे. हे दोघेही हैदराबादचे रहिवासी होते. हैदराबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असताना अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.

परप्रांतीय दाम्पत्याचा जागीच मृत्यू

अपघातात परप्रांतीय दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून, कारमधील इतर जखमी झाले आहेत. या अपघातामधील 5 जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच, जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या 5 जणांना पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

जखमींवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू

जखमींवर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Accident on dhule solapur road two dead 5 seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • Accident Case
  • Accident News
  • jalna news

संबंधित बातम्या

ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले
1

ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले

Jitendra Shelke: मोठी बातमी! भोंदूबाबा अशोक खरातचा जवळचा सहकारी जितेंद्र शेळके अपघातात ठार; कारचा चक्काचूर, घटनेभोवती संशयाची छाया
2

Jitendra Shelke: मोठी बातमी! भोंदूबाबा अशोक खरातचा जवळचा सहकारी जितेंद्र शेळके अपघातात ठार; कारचा चक्काचूर, घटनेभोवती संशयाची छाया

लागाचा घाट बनला मृत्यूचा सापळा, प्रवाशांचा जीव टांगणीला; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
3

लागाचा घाट बनला मृत्यूचा सापळा, प्रवाशांचा जीव टांगणीला; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Accident News: ठाण्यात भीषण अपघात! भरधाव कार ट्रकवर आदळली; चालकाचा जागीच मृत्यू, तर 4 जण…
4

Accident News: ठाण्यात भीषण अपघात! भरधाव कार ट्रकवर आदळली; चालकाचा जागीच मृत्यू, तर 4 जण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.