Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Shelke: मोठी बातमी! भोंदूबाबा अशोक खरातचा जवळचा सहकारी जितेंद्र शेळके अपघातात ठार; कारचा चक्काचूर, घटनेभोवती संशयाची छाया

जितेंद्र शेळके आपल्या कुटुंबासह कारने संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होता. धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने त्याची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 17, 2026 | 02:33 PM
भोंदूबाबा अशोक खरातचा जवळचा सहकारी जितेंद्र शेळके अपघातात मृत (Photo Credit- X)_

भोंदूबाबा अशोक खरातचा जवळचा सहकारी जितेंद्र शेळके अपघातात मृत (Photo Credit- X)_

Follow Us
Follow Us:
  • भोंदूबाबा अशोक खरातचा जवळचा सहकारी जितेंद्र शेळके अपघातात ठार
  • कारचा चक्काचूर
  • घटनेभोवती संशयाची छाया
Jitendra Shelke Accident News: समृद्धी महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात ‘शिवनिका ट्रस्ट’चा माजी उपाध्यक्ष आणि भोंदूबाबा अशोक खरातचा अत्यंत निकटवर्तीय जितेंद्र शेळके याचा जागीच मृत्यू झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके आपल्या कुटुंबासह कारने संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होता. धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने त्याची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. कारचा चक्काचूर झाला असून जितेंद्र शेळके याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात शेळके याचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर त्याची पत्नी बराच वेळ कारमध्ये अडकून पडली होती.

कोण होता जितेंद्र शेळके?

जितेंद्र शेळके हा अशोक खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चा उपाध्यक्ष होता. खरातच्या अनेक व्यवसायांत, विशेषतः लॉन्समध्ये शेळके याची भागीदारी असल्याची चर्चा होती. खरातला लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाल्यापासून शेळके प्रचंड मानसिक तणावाखाली होता. खरातचे काळे कारनामे बाहेर येताच शेळके आणि सुभाष गमे यांनी आपल्या पदाचे राजीनामे नाशिक धर्मादाय आयुक्तांकडे पाठवले होते.

Maharashtra Politics : “खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडीओ आहेत का? रोहित पवारांच्या प्रश्नांने उंचावल्या भुवया

रोहित पवारांना संशय

रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अपघात घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी.

शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची… — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 17, 2026

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी ईडीचे 11 ठिकाणी छापेमारी, तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी

सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संशय

जितेंद्र शेळके याच्या मृत्यूती बातमी शॉकिंग आहे. अनेकांनी अंदाज वर्तवले होते की खरात किंवा त्याच्या निकटवर्तीयांच्या जीवाला धोका आहे. असंख्या लोकांनी आपलं म्हणणं मांडलं होतं. आता ही घटना घडणे हे कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी खऱ्या करणाऱ्या आहेत. यानिमित्ताने खरातच्या जीवाताच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेळकेच्या मृत्यूमुळे अनेक गोष्टी बाहेर येता येता राहतील की काय? अशी आता भीती वाटत आहे. असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

Web Title: Jitendra shelke a close associate of the fraudulent godman ashok kharat dies in an accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Accident News
  • Ashok Kharat Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik: मध्यरात्री आलिशान गाड्यांतून आले अन् स्मशानभूमीत केली अघोरी विधी; अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू,आणि…
1

Nashik: मध्यरात्री आलिशान गाड्यांतून आले अन् स्मशानभूमीत केली अघोरी विधी; अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू,आणि…

Shrikant Shinde convoy accident: श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात; नांदेडमध्ये घडली घटना
2

Shrikant Shinde convoy accident: श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात; नांदेडमध्ये घडली घटना

Nashik Crime: जिच्यासाठी घर सोडलं, तिनेच प्रियकराला संपवलं; लिव्ह-इन रिलेशनशिपचा थरारक अंत! नाशिक येथील घटना
3

Nashik Crime: जिच्यासाठी घर सोडलं, तिनेच प्रियकराला संपवलं; लिव्ह-इन रिलेशनशिपचा थरारक अंत! नाशिक येथील घटना

Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू
4

Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.