Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: ठाण्यात भीषण अपघात! भरधाव कार ट्रकवर आदळली; चालकाचा जागीच मृत्यू, तर 4 जण…

कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघातात 11 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी पहाटे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 14, 2026 | 08:20 PM
ठाण्यात भीषण अपघात! भरधाव कार ट्रकवर आदळली (Photo Credit- X)

ठाण्यात भीषण अपघात! भरधाव कार ट्रकवर आदळली (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • ठाण्यात भीषण अपघात!
  • भरधाव कार ट्रकवर आदळली;
  • चालकाचा जागीच मृत्यू, तर 4 जण…
ठाणे जिल्ह्यात रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघातात 11 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी पहाटे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. भरधाव कार ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या या अपघातात 26 वर्षीय कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

कामावरून घरी परतताना काळाचा घाला

अपघातातील सर्व तरुण एका नामांकित आयटी (IT) कंपनीत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आपले काम संपवून कार्यालयातून घरी परतत असताना हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 3 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास खारेगाव टोल प्लाजाजवळील एका पेट्रोल पंपापाशी ही घटना घडली.

कारचा चक्काचूर; चालक आतच अडकला

पहाटेच्या वेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पुढे चाललेल्या एका ट्रेलर ट्रकच्या मागील भागावर जाऊन जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि चालक दीपक पाटेकर कारच्या आतच अडकून पडला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि क्रेनच्या मदतीने चालकाला बाहेर काढले.

Kalyan Accident : कल्याण- अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात, टॅक्सीला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक, 11 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी

डोंबिवलीचे 4 तरुण मृत्यूशी झुंज देत

अपघातात ठार झालेला चालक दीपक पाटेकर (वय २६, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला तातडीने कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कारमधील इतर चार तरुण, ज्यांचे वय 20 ते 23 वर्षांच्या दरम्यान आहे, ते गंभीर जखमी झाले आहेत. हे चौघेही डोंबिवलीचे रहिवासी असून त्यांच्यावर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

अपघाताची भीषणता पाहून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. खारेगाव टोल नाका परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरीसाठी गेलेल्या महिलांसह 8 जणांना ट्रकने चिरडलं

Web Title: Mumbai nashik highway accident thane it employee death kharegaon toll

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Accident
  • Accident News
  • thane

संबंधित बातम्या

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद
1

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद

Thane Crime: संतापजनक! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव
2

Thane Crime: संतापजनक! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video
3

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video

Nashik Accident : ब्रेक फेल झालेल्या क्रेनचा महामार्गावर कहर; चार वाहनांना धडक, लहान मुलासह दोघांचा मृत्यू
4

Nashik Accident : ब्रेक फेल झालेल्या क्रेनचा महामार्गावर कहर; चार वाहनांना धडक, लहान मुलासह दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.