डोंबिवलीत उघड्या नाल्यात एका 13 वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर हत्या आहे. KDMC आणि बेफिकर प्रशासनाने केलेली हत्या आहे अशा गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.
मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच डोंबिवलीत संतापाची लाड पसरली आहे. मंडपात भंडाऱ्या दरम्यान जेवणासाठी गेलेला मुलगा उघड्या नाल्यात पडला. या नाल्याचे झाकण उघडे होते. या नाल्याच्या जेवणासाठी आलेली लोक हात धुत होती. नाल्यावरील झाकण काही दिवसापूर्वी तुटले. MMRDA कडून रिंग रोड प्रकल्पाचे काम सुरु आहे. याठिकाणी RMC च्या गाड्या जातात. या गाड्यामुळे नाल्यावरील झाकण तुटले होते.
काय म्हणाले राजू पाटील ?
डोंबिवलीत १२/१३ वर्षांच्या चिमुकल्या आयुष चा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. हा अपघात नाही, तर केडी‘यम’सी आणि बेफिकीर प्रशासनाने केलेली हत्या आहे !
नाले झाकण्याचं काम न केल्यामुळे, वर्षानुवर्षं सुरू असलेल्या केडिएमसीच्या भोंगळ कारभारामुळे निरपराध जीव जात आहेत. काही… pic.twitter.com/fudDm2sm9K — Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 29, 2025
डोंबिवलीत १२/१३ वर्षांच्या चिमुकल्या आयुष चा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. हा अपघात नाही, तर केडी‘यम’सी आणि बेफिकीर प्रशासनाने केलेली हत्या आहे. नाले झाकण्याचं काम न केल्यामुळे, वर्षानुवर्षं सुरू असलेल्या केडिएमसीच्या भोंगळ कारभारामुळे निरपराध जीव जात आहेत. काहीनागरीकांनी वारंवार तक्रार करुन प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनसे नेते राजू पाटील यांनी ट्वीट करीत संताप व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, डोंबिवलीत 13 वर्षांच्या चिमुकल्या आयुष चा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. हा अपघात नाही, तर केडी ‘यम’सी आणि बेफिकीर प्रशासनाने केलेली हत्या आहे ! नाले झाकण्याचं काम न केल्यामुळे, वर्षानुवर्षं सुरू असलेल्या केडिएमसीच्या भोंगळ कारभारामुळे निरपराध जीव जात आहेत. काही वर्षांपूर्वी नांदीवलीतील दोन तरुण, खंबाळपाड्यात मॅनहोलमध्ये तिघांचा मृत्यू, आयरे गावात इमारत कोसळून मृत्यू.ही मृत्यूंची मालिका कधी थांबणार आहे ? अजून किती जणांनी प्राण गमावल्या नंतर प्रशासन जागे होणार? या हत्येला जबाबदार कोण ? त्यांच्यावर कारवाई कोण करणार?
डोंबिवलीत उघड्या नाल्यात एका १३ वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मनसे नेते राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करीत संताप व्यक्त केला आहे. आत्ता प्रशासन किती लोकांचा जीव घेणार. हा अपघात नाही. तर ही हत्या आहे. तर केडी ‘यम’सी आणि बेफिकर प्रशासनाने केलेली हत्या आहे अशा गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.
मनसे नेते राजू पाटील यांनी हे ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. केडीएमसीच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या निष्काळजीपणामुळे नुकत्याच काही महिन्यात किती लोकांचा मृत्यू झाला हे देखील सांगितले आहे. राजू पाटील यांचे म्हणणे आहे की आतापर्यंत इतक्या लोकांचा मृत्यू झाला. आता या मुलाचा मृत्यू झाला. यासाठी कोणाला जबाबदार ठरविले जाणार अजून किती जणांनी प्राण गमाविल्यांतर प्रशासन जागे होणार असा सवाल उपस्थित केला आहे.