नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली अन्...; २ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Road Accideent news in Marathi : काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) एक भीषण दुर्घटना घडली आहे. लुंबिनी प्रांतात सोमवारी (२९ सप्टेंबर) एक भीषण रस्ते अपघात ( Road Accident) घडला आहे. एक मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट दरीत कोसळली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक लोक जखमी आहेत सध्या बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
काठमांडूच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या लुंबिनी प्रांतातील अर्घाखांची जिल्ह्यात ही घटना घडली. एका वळणावर अचानक मिनी-बसचे ब्रेक फेल झाले. यामुळे चालकाने बसवरील नियंत्रण ममावले आणि अपघात झाला. यावेळी बस बुटवलहून पुरकोटदाहाकडे निघाली होती.
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी
वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये २४ प्रवासी होती. यातील २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. इतर २४ प्रवासी जखमी आहेत. वृत्तानुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
यापूर्वी नेपाळमध्ये जुलै २०२५ मध्ये एक जीपचा भीषण अपघात झाला होता. एक जीप अचानक दगडांनी धडकून १०० मीटर खोल दरीत पडली होती. यामध्ये दोन जणांचा मृत्यू, तर सहा जखमी झाले होते. नेपळच्या सुदूर पश्चिम प्रांतात ही घटना घडली होती.
गेले काही दिवस नेपाळमध्ये अस्थिरतेचे वातावरण होते. नेपाळच्या ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीविरोधत Gen Z ने तीव्र आंदोलन छेडले होते. तसेच सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधा, नेपोटिझम, आणि देशातील बेरोजगारी या कारणांमुळेही आंदोलनाने हिंसक रुप घेतले होते. यावेळी अनेक मंत्र्यांची घरे जाळण्यात आली, त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच ओली शर्मा यांना राजीनामा द्यावा लागला. या निदर्शनांदरम्यान एका भारतीय महिलेसह ५१ जणांचा मृत्यू झाला होता.
सध्या नेपाळमधील परिस्थिती स्थिर होत आहे. अंतिरम सरकारची स्थापना झाली आहे. याचे नेतृत्त्वा माजी महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की करत आहे. त्यांनी ०५ मार्च २०२६ पूर्वी देशात निवडणूका घेण्याची घोषणा केली आहे.
प्रश्न १. नेपाळमध्ये कुठे झाला बस अपघात?
नेपाळमध्ये लुंबिनी प्रांतात अर्घाखांची जिल्ह्यात भीषण बस अपघात झाला आहे.
प्रश्न २. नेपाळच्या बस अपघातात किती जीवितहानी झाली?
नेपाळच्या बस अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर २४ जण जखमी आहेत.
प्रश्न ३. नेपाळच्या बस अपघाताचे कारण काय?
नेपाळच्या लुंबिनी प्रांतात एक मिनी-बस ब्रेक फेल झाल्याने दरीत कोसळली. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडाला.
आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर