
जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष हा धोरणात्मक पातळीवर न राहता वैयक्तिक स्वरूप धारण करत असून त्याचे पडसाद थेट स्थानिक राजकारणात उमटताना दिसत आहेत. एकूणच, या महापालिका निवडणुकीत विकासाचा मुद्दा दुय्यम ठरून व्यक्तिगत टीका आणि राजकीय आरोपांचेच वर्चस्व असल्याचे चित्र आहे. अंतिम निकाल काय लागतो, हे मतदानानंतर स्पष्ट होईल, मात्र या निवडणुकीने प्रचाराची पातळी, विकासाविषयीची राजकीय बांधिलकी राजकीय संस्कृती आणि शहराच्या यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विकासाचा ठोस आराखडा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे प्रचारात रंगत
वाढली असली तरी शहराच्या दीर्घकालीन नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवरची चर्चा मात्र दुय्यम ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
नेत्याच्या टिप्पणीचा फटका थेट उमेदवारानाही बसता आहे. वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्तिगत पातळीवर टीका होत असल्याने प्रभागातील काही उमेदवार देखील मर्यादा ओलांडत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगी जीवनावर टीका करत असल्याचे आरोप होत आहेत. काही ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करून अपप्रचार, अफवा आणि टीका-टिप्पणी केली जात असून प्रचार अधिकच कटु होत बालला आहे. तक्रारचा होत नसल्याने कारवाईची नोंदच कुठेच होत नाही.
निवडणूक म्हणजे शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी प्रक्रिया असते, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र वैयक्तिक आरोपाचे राजकारण पुढे येत असल्याने मतदार नाराजी व्यक्त करत आहेत. पुढील पाच वर्षात शहरासाठी नेमके काय करणार, हा प्रश्न वारंवार उपस्थित होत असला तरी त्याची ठोस उत्तरे अजूनही कुठेच मिळत नाहीत.