यवतमाळ : वरोरा येथून पांढरकवडा येथे वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातात चालकसह इतर तीन जण जागीच ठार (Four Killed in Accident) झाले. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना कोठोडाजवळ घडली.
वृत्तपत्र घेऊन जाणारी व्हॅन कोठोडाजवळ येताच भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात चालकासह अन्य तीन जण जागीच ठार झाले. यामध्ये व्हॅनच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या वाहनाला पांढरकवडा तालुक्यात अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
पहाटेच्या सुमारास झाला अपघात
अज्ञात वाहनाने व्हॅनला पहाटेच्या सुमारास जोरदार धडक दिली. यात व्हॅन चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर व्हॅनला धडक देणाऱ्या वाहनाने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी
व्हॅनला समोरच्या बाजूने जोरात धडक बसल्याने गाडीच्या चालकासह सर्वच जण चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग करंजी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर त्यांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात अडचण येत होत्या.