Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या हत्या प्रकरणात आरोपीला आजीवन कारावास

दिलीप यांनी पत्नीस सांगितले की, माझे व संदिपची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय संदिपला होता. त्याने यापूर्वीही दोन ते तीन वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याची समजूत काढल्यानंतरही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दिलीप यांची पत्नी वंदना निमकरडे यांनी या घटनेची तक्रार शिरखेड पोलीस ठाण्यात नोंदविली.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 08, 2022 | 01:06 PM
Accused sentenced to life imprisonment in murder case on suspicion of immoral relationship

Accused sentenced to life imprisonment in murder case on suspicion of immoral relationship

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : हत्या प्रकरणातील एका आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (District and Sessions Judge) रविंद्र एम. जोशी (Ravindra M. Joshi ) यांच्या न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा (Life imprisonment) व १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. संदिप मधुकर तायडे (४०, रा. धामणगाव, ता. मोर्शी, जि. अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शिरखेड पोलीस ठाण्याच्या (Shirkhed Police Station) हद्दीतील धामणगाव (Dhamangaon) शिवारात १२ जानेवारी २०१७ रोजी घडली होती.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून केली होती हत्या

विधी सुत्रानुसार, धामणगाव येथील रहिवासी दिलीप देविदास निमकरडे (४५) हे १२ जानेवारी २०१७ रोजी गावातील वृध्द व्यक्ती देविदास अडायके यांच्या अंत्यविधीकरीता विश्वासराव देशमुख यांच्या शेतात गेले होते. त्यावेळी अंत्यविधीकरिता खड्डा खोदायला आलेला संदिप मधुकर तायडे हा हातात सब्बल घेऊन दिलीप यांच्या अंगावर धाऊन आला. त्याने दिलीप यांच्या डोक्यावर सब्बल मारला. त्यावेळी तेथे उपस्थित निलेश निमकरडे यांनी संदिप तायडेला बाजुला केले. त्यानंतर संदिप हा सब्बल घेऊन पसार झाला. त्यानंतर दिलीप यांना नागरिकांनी ऑटोत टाकले.  दरम्यान प्रत्यक्षदर्शी व निलेश निमकरडे हे दोघेही दिलीप यांच्या घरी गेले आणि त्यांनी या घटनेची माहिती दिलीप यांच्या पत्नीला दिली.

त्यानंतर ते सर्व लगेच दिलीप यांना घेऊन रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. त्यावेळी दिलीप यांनी पत्नीस सांगितले की, माझे व संदिपची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय संदिपला होता. त्याने यापूर्वीही दोन ते तीन वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याची समजूत काढल्यानंतरही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर दिलीप यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना डॉ. सावेदकर यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर दिलीप यांची पत्नी वंदना निमकरडे यांनी या घटनेची तक्रार शिरखेड पोलीस ठाण्यात नोंदविली.

दरम्यान १३ जानेवारी २०१७ रोजी दिलीप यांचा उचचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात भादंविची कलम ३०२ वाढविली. या गुन्ह्यात तपास पूर्ण करून शिरखेड पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता परीक्षित शरद गणोरकर यांनी दोषसिध्द करण्याकरिता एकूण नऊ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्ती वादानंतर आरोपीचा दोष सिध्द झाला. न्यायालयाने आरोपी संदीप तायडेला आजीवन कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणाचा तपास एपीआय सचिन तायवाडे यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून शिरखेड ठाण्यातील पोलीस नाईक ममता चौव्हाण यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Accused sentenced to life imprisonment in murder case on suspicion of immoral relationship nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 01:05 PM

Topics:  

  • amaravati news
  • crime news
  • life imprisonment

संबंधित बातम्या

पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला
1

पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
2

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
3

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?
4

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.