Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियमभंग करणाऱ्या २२१ वाहनांवर कारवाई, मंगळवेढा शहरात वाहतुक पोलिसांची कारवाई; १ लाख ३४ हजाराचा दंड वसूल

वाहतूक शाखेच्या पोलीसांनी कारवाई करुन १ लाख ३४ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान या कारवाईमुळे बेशिस्तपणा वाढलेल्या वाहन चालकांना चांगलीच चपराक बसली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2023 | 02:33 PM
नियमभंग करणाऱ्या २२१ वाहनांवर कारवाई, मंगळवेढा शहरात वाहतुक पोलिसांची कारवाई; १ लाख ३४ हजाराचा दंड वसूल
Follow Us
Follow Us:

मंगळवेढा : मंगळवेढा शहरात वाहन चालक रस्त्यात गाड्या कुठेही उभा करीत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. दरम्यान मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कार्यभार प्रभारी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी स्वीकारल्यानंतर दि. १ ते १० ऑगस्ट दरम्यान छोट्या- मोठ्या वाहनावर वाहतूक शाखेच्या पोलीसांनी कारवाई करुन १ लाख ३४ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान या कारवाईमुळे बेशिस्तपणा वाढलेल्या वाहन चालकांना चांगलीच चपराक बसली आहे.

मंगळवेढा शहरात वाहन चालकामध्ये बेशिस्तपणा मोठ्या प्रमाणात वाढला होता. शहरातील मुळात रस्ते हे लहान असून व्यापार्‍यांनी दुकानाच्यापुढे पार्किंगची व्यवस्था न केल्यामुळे ग्राहकांची आलेली वाहने नाईलाजाने रस्त्यावर लावून खरेदीला जाण्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. आठवडी बाजार दिवशी याचा त्रास नागरिकांना अधिक प्रमाणात सोसावा लागत असे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील वाहनधारकावर कारवाईचा बडगा उचलला आहे. नियमांचे पालन न करणार्‍या वाहन चालकावर कारवाई केली.

हातगाड्यांवर देखील कारवाईचा इशारा

पोलिसांनी कारवाईवेळी चक्क व्हॅन ऐवजी खासगी वाहनाचा वापर केला. नित्यनियमाने दररोज सायंकाळी शहराच्या मध्यभागातून पोलिसांची खासगी गाडी फिरत असल्याने वाहन चालकांना शिस्त लागत आहे. परिणामी दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक आदी ठिकाणी रस्ते मोकळे झाल्याने सुटसुटीतपणा दिसत आहे. दामाजी चौकात भररस्त्यावर छोटे-मोठे हातगाडे दिवसभर उभे करत असल्याने ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावर उभ्या करत असल्याचे चित्र होते. या व्यवसायिकांना पोलीस अधिकारी साटम यांनी रस्त्यावर हातगाडे उभे करु नका सक्त सूचना केल्याने ते हातगाडे पाठीमागील बाजूला सरकावल्याने हा चौक येणार्‍या-जाणार्‍यासाठी विनाअडथळा ठरला आहे.

१९३ वाहनांवर केसेस दाखल

या कारवाईत वाहतूक शाखेने रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्‍या 193 वाहनावर केसेस करुन 1 लाख 15 हजार 500 तर लायसन्स नसणे, सीटबेल्ट न लावणे, ट्रिपल सीट व इतर 28 केसेस करुन 18 हजार 900 इतका दंड वसूल केला आहे. दरम्यान कारवाईमुळे वाहनचालकांना शिस्त लागत असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. पोलीस अधिकारी साटम ह्या मंगळवेढा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून किमान एक वर्ष रहाव्यात अशा प्रतिक्रिया ही सुज्ञ नागरिकामधून व्यक्त होत आहेत. या कारवाई मोहिमेत वाहतूक शाखेचे पोलीस नाईक शिवाजी पांढरे,पोलीस अंमलदार प्रविण जाधव, सचिन काळेल सहभागी आहेत.

Web Title: Action against 221 vehicles violating rules traffic police action in mangalvedha city 1 lakh 34 thousand fine was recovered nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2023 | 02:33 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Mangalvedha

संबंधित बातम्या

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
1

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
2

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
3

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.