श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या विना परवाना वाळू उपसा करत असलेल्या बोटी रंगेहात पकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
श्रीगोंदा तालुक्यातील भिमा नदीच्या पात्रात रात्रंदिवस राजरोसपणे अनेक दिवसांपासून वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार मिलिंद कुलथे यांना समजली त्यानुसार आज तहसीलदार कुलथे व त्यांच्या पथकाला आर्वी व अजनुज या ठिकाणी भीमा नदी पत्रात वाळू उपसा करत असणारी बोट दिसून आली. तहसीलदार यांच्या पथकाने पाहताच बोटीवरील चालक व ईतर कर्मचारी पळून गेले. मात्र तहसीलदार यांनी २० लाख रुपये किमतीच्या दोन्ही बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या.
अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील व पोलीस अधीक्षक राकेश ओला हजर झाल्यापासून वाळू तस्करीला आळा बसला आहे. श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचा सुद्धा श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंदे व वाळू तस्करांनी धसका घेतला आहे.
अल्पावधीमध्ये श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी वाळू माफियांची संख्या दिवसेंदिवस वाढु लागलेली आहे. नवीन तरुण मुले वाळू तस्करीकडे वळु लागली आहेत. त्यातूनच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उदयास आली आहे. परंतु पोलीस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंद्यात आल्यापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी नष्ट केली आहे.