
Actor Akshay Kumar requests CM Devendra Fadnavis to change the shoes of Maharashtra Police
अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीमध्ये पोलिसांच्या गणवेशावरुन चर्चा झाली. यावेळी अक्षय कुमारने पोलिसांचे पायातील शूजमध्ये बदल करण्यास सुचवले आहे. अभिनेता अक्षय कुमा म्हणाला की, पोलिसांच्या बुटांमुळे त्यांना धावताना अडचणी येतात. पोलीस जे बूट वापरतात, त्याचे हिल्स (टाचा) असते, त्यामुळे धावणे कठिण होतं. मी स्पोर्ट्समन असल्याने मला वाटतं, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर… पोलीस जेव्हा धावतात, तेव्हा त्यांच्या पाठीला काहीना काही अडचणी येतात. त्यांचे बूट बदलले, तर त्याचा पोलिसांना उपयोग होईल. ते अधिक धावू शकतील, असा मुद्दा अभिनेता अक्षय कुमारने मुलाखतीदरम्यान, उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अभिनेता अक्षय कुमारने हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी देखील अक्षय कुमारच्या सूचवलेल्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सहमती असल्याचे सांगितले. तुम्ही चांगली गोष्ट सांगितली. आतापर्यंत कुणीही गोष्ट लक्षात आणून दिली नाही. पोलीस हेच बूट घालून कवायत करतात, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल अभिनेता अक्षय कुमारचे कौतुक केले. तसेच या शूटचे डिझाईन देखील अक्षय कुमारला देण्यास सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुलाखतीमध्ये अक्षय कुमारच्या मागणीला उत्तर देताना फडणवीसांनी थेट अक्षय कुमारला थेट बूट डिझाईन करण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही काही डिझाईन किंवा इनोव्हेशन सांगितलं, तर आपण करू. तुम्ही अॅक्शन हिरो आहात. त्यामुळे तुम्हाला बूट कोणता वापरला पाहिजे हे माहीत आहे. तुम्ही सूचवा. आपण करू,”असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले.