Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार

भाजप आणि शिंदे गटाकडून कल्याण डोंबिवली भागात एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडाफोडीचे प्रकार सुरु झाले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातूनच हा प्रकार सुरू झाला होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 21, 2025 | 03:22 PM
Thane Politics

Thane Politics

Follow Us
Close
Follow Us:
  • शिंदे-फडणवीस नाराजीनाट्याचा स्थानिक पातळीवर परिणाम
  • भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण
  • कल्याण डोंबिवली भागात एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडाफोडीचे प्रकार
Thane Politics:  मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) विरुद्ध उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात संघर्ष आणि नाराजीनाट्याचा आता स्थानिक पातळवरही परिणाम दिसू लागला आहे. ठाण्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू असतानाच शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची माहिती आहे. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडिक, शाखाप्रमुख महेश लहाने, उपविभागप्रमुखांना मारहाण केली. या मारहाण प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला रात्री उशिरा याप्रकरणी तक्रर दाखल करण्यात आली.

Local Body Election: माळेगाव निवडणुकीत राष्ट्रवादी जनमत आघाडी माघार घेणार? इच्छुकांनी थेट…

शिंदेंची अमित शाहांकडे तक्रार

शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यप्रणालीबाबत एकनाथ शिंदेंनी तक्रारही केली. कल्याण–डोंबिवलीसह अनेक ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्यात आल्याचा, तसेच अनेक माजी नगरसेवकांना आमिष देऊन भाजपमध्ये घेतल्याचा आरोप शिंदेंनी केला. निधी वितरणापासून ते संघटनात्मक पातळीवरील हस्तक्षेपापर्यंत अनेक मुद्दे शाहांसमोर शिंदेंनी मांडल्याचे बोलले जाते. या घडामोडींमुळे महायुतीच्या ठाण्यातील समीकरणांमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी उफाळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘होमपिच’ ठाण्यातच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गंभीर वाद झाल्याचे समोर आले आहे. सरकारच्या एका निर्णयाचे क्रेडिट कोणाला, यावरून सुरू झालेल्या वादाची परिणती हातघाईवर झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

सरकारच्या निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते लक्ष्मी नारायण इमारतीत जमले होते. मात्र, यावेळी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार येथे दाखल झाले आणि “क्रेडिट घेण्याचा” मुद्दा उपस्थित करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धमकीही दिल्याचा दावा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.

Maharashtra Politics: नक्कीच काहीतरी बिनसलंय? एकनाथ शिंदेंना नेमकं झालयं तरी काय?

या घटनेनंतर नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. “दादागिरीला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल,” असा इशारा देत त्यांनी शिवसैनिकांची नाराजी स्पष्ट केली. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा जल्लोष दाखवण्यासाठी पदाधिकारी व्हिडीओ कॉल करणार होते, त्याचवेळी हा वाद उद्भवला. त्यामुळे ठाण्यात भाजप–शिंदे गटातील मतभेद तीव्र झाल्याचे चित्र पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे.

भाजप आणि शिंदे गटाकडून कल्याण डोंबिवली भागात एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडाफोडीचे प्रकार सुरु झाले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातूनच हा प्रकार सुरू झाला होती. त्यामुळेच शिंदे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. या फोडाफोडीबाबत एकनाथ शिंदे यांनीही याबाबतची तक्रार गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. तसेच, शिंदे गटाच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहत बैठकीवर बहिष्कार घातला. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांही सुरू झाल्या होत्या.

 

Web Title: Former bjp corporator assaults shinde group office bearers politics will heat up in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: नक्कीच काहीतरी बिनसलंय? एकनाथ शिंदेंना नेमकं झालयं तरी काय?
1

Maharashtra Politics: नक्कीच काहीतरी बिनसलंय? एकनाथ शिंदेंना नेमकं झालयं तरी काय?

Shahaji Bapu Patil: गुवाहटीची वारी करणाऱ्या शहाजी बापू पाटलांना कॅन्सर? मुख्यमंत्री फडणवीसांना केले भावनिक आवाहन
2

Shahaji Bapu Patil: गुवाहटीची वारी करणाऱ्या शहाजी बापू पाटलांना कॅन्सर? मुख्यमंत्री फडणवीसांना केले भावनिक आवाहन

दिव्यांगजनांना मिळाला आधार! CM फडणवीसांच्या प्रयत्नातून 28 युवकांना मिळाला रोजगार
3

दिव्यांगजनांना मिळाला आधार! CM फडणवीसांच्या प्रयत्नातून 28 युवकांना मिळाला रोजगार

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप
4

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.