Minister Aditi Tatkare said when the May installment of Ladki Bahin Yojana will give
Aditi Tatkare on Ladki Bahini Yojana: महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा झाला आहे. यानंतर आता महिलांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, लाडकी बहिण योजनेतील 2100 रुपये कधी मिळणार? याचदरम्यान आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी (2 जानेवारी 2025) पार पडली. या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेतील अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. त्यामुळं आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे. यापार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लाडकी बहीन योजनेतील अर्जांची पडताळणी होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी आज (2 जानेवारी) दिली. तसेच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. अर्ज सरसकट बाद होणार नाहीत पण ज्यांच्या घरी दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आधार कार्डची माहिती जुळत नसल्यास किंवा नोकरीला असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
तर दूसरीकडे या योजनेवरुन विरोधकांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारची चांगलीच कोंडी केली होती. योजना चालू ठेवण्यासाठी पैसा कुठून जमा होणार, असा सवाल विरोधकांनी केला होता. तसेच ही योजना सुरू ठेवण्यासाठी इतर योजनांचा पैसा हा या योजनेसाठी वळवला जाईल अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली होती. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘नागपूरच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती, 24 तारखेपासून लाडकी बहीन योजनेचे हफ्ते सुरु झाले. अन्य विभागाचा वाया जाणारा निधी लाडकी बहीन योजनेकडे वळवण्यात आलेला नाही. त्या त्या विभागाचे मंत्री निधी पाहात आहेत. त्या त्या विभागाचे मंत्री काम करत आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात महिलांवरील अत्याचार सुरुच आहे, अशी प्रतिक्रियाही आदिती तटकरे यांनी यावेळी दिली आहे. केंद्र सरकारने जे कायदे आणले आहेत, त्याच्यानुसार आता कडक कारवाई होईल, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.