Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण; आदित्य ठाकरे आक्रमक

कल्याणमधील योगीधाम परिसरातील अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा हाईटसमध्ये राहणारे आजूबाजूला राहतात. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता देवपूजा केल्यानंतर घराच्याबाहेर धूप लावायच्या

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 20, 2024 | 01:24 PM
Kalyan News: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण; आदित्य ठाकरे आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याने गुंडांकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला. तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात, तुमचे मराठीपण बाहेर काढतो. असं म्हणत त्यांने मराठी कुटुंबियांना मारहाण केली होती. या घटनेवरून राज्याचं राजकारणही चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

 आदित्य ठाकरे म्हणाले की, कल्याणमध्ये जे काही घटना दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सरकार आता या वादाला हवा देतायेत का, असा सवाल आदित्य ठाकरे यंनी उपस्थित केला आहे. तसेच, मागच्या महिन्यातही एका महिलेला मारवाडीत बोलण्यास भाग पाडले गेले.  मुंबई आणि महाराष्ट्र आमचा आहे. मुंबई आधी महाराष्ट्राची आहे. नंतर या देशाची आहे. तुम्ही या, रहा, काम करता. काही हरकत नाहीत पण मराठी माणसाला हतयाराने मारले, जर कोणी त्यांचं तोंड फोडलं तर पोलिसांनी बोलायच नाही. हे जे कोणी अधिकारी आहेत ते एमटीडीसी मधले आहेत. त्यामुळे मराठी माणसाला मटण-मांस खाण्यावरून बोलले जात असेल तर अशा ते पार्सल जिथून आले आहे तिथून आले आहे तिथे त्याला पाठवून द्यावे, मुंबई किंवा महाराष्ट्रात शाकाहारी सोसायटी करायचा प्रयत्न होत असेल तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे, मराठी माणसांना घरं दिली नाही तर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

Parliament Winter Session : संसदेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी अन् विरोधी खासदार भिडले! लोकसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला कोणी दाबण्याचा किंवा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, कोणी दादागिरी करत असेल तर पोलिसांनीही त्याला दांडका काय असतो, हे दाखवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रेमी आणि या मातीतले असतील तर त्यांनी आमच्या मागणीला मान देऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र द्रोहाचा कायदा आणतील, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 कल्याणमध्ये नेमक काय झालं

कल्याणमधील योगीधाम परिसरातील अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा हाईटसमध्ये राहणारे आजूबाजूला राहतात. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता देवपूजा केल्यानंतर घराच्याबाहेर धूप लावायच्या. या धुपाचा धूर कळवीकट्टे यांच्या धरात जायचा. कळवीकट्टे यांच्या घरात लहान मुल आणि वयोवृद्ध  आईला धम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे यांनी त्यांना घराबाहेर धूप न लावण्याची विनंती केली होती. पण त्यावरून शुक्ला यांच्या पत्नीने त्यांच्यासोबत मुद्दामपणे वाद घालण्यास सुरूवात केली.

श्रीलंकेने केला डबल गेम; भारताला सागरी सुरक्षेचे आश्वासन ठरले पोकळ, पण चीन सुरू करणार

हा वाद सुरू असतानाबाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण शुक्लाला याचा राग आल्याने शुक्लाने 10-15 गुंडांना बोलावून देशमुख बंधुंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात दोन्ही देशमुख बंधू गंभीर जखमी झाले. त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक माहिती मिळवली असता या सोसायटीत अखिलेश शुक्ला हे वादग्रस्त व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. शुक्लाने यापूर्वीही अनेक मराठी माणसांना त्रास दिला आहे. शुक्लांविरोधात अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

 

Web Title: Aditya thackeray demands cancellation of oc of person who beat up marathi man in kalyan nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 01:24 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Mumbai
  • shivsena

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
4

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.