African snails found in FTII and Channel Film Archive of India campuses Pune News
Pune News : पुणे : शहरातील कोथरुड येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), राष्ट्रीय चित्रपट संग्रह (नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कॅम्पसमध्ये ‘लिसाचॅटिना फुलिका’ या महाकाय आफ्रिकन गोगलगायी मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत. भिंतींवर, रस्त्यांवर, जमिनीवर, झाडांवर आणि लागवडींवर या गोगलगायी समूहाने दिसत आहेत.
या आफ्रिकन गोगलगायी सुमारे ५०० प्रजातींच्या वनस्पती आणि पिकांचे नुकसान करतात. त्याचबरोबर २०२३ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये प्रकाशित अहवालानुसार, या गोगलगायी ३६ प्रजातींचे रोगजनक वाहून नेऊ शकतात, ज्यापैकी दोन तृतीयांश प्रजाती मानवांना संक्रमित होऊ शकतात.
पुण्यातील पश्चिम प्रादेशिक प्राणी सर्वेक्षण केंद्राचे डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या गोगलगायी वेगाने प्रजनन करतात आणि थोड्याच वेळात मोठ्या क्षेत्रात पसरतात. त्यांनी सांगितले की, या गोगलगायींचा प्रादुर्भाव शेती, बागा आणि शहरी परिसंस्थेसाठी धोकादायक आहे. रस्त्यावर गोगलगायींचा समूह चिरडल्यास त्यातून येणारा निसरडा द्रव हा अपघातासाठी धोकादायक ठरू शकतो.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या आफ्रिकन गोगलगायी भारतात १८४७ पासून आढळत असून, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दिसू लागल्या आहेत. पुणे शहरातही त्या पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात दिसत आहेत. युट्यूबवरील काही व्हिडिओंमध्येही या गोगलगायींना ‘परिसंस्थेचा खलनायक’ म्हणून चित्रित केले गेले आहे. या गोगलगायींवर प्रभावी नियंत्रणासाठी बहुआयामी उपाययोजना आवश्यक आहे, ज्यामध्ये रसायने आणि भौतिक नाश यांचा समावेश असू शकतो.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
१० कोटी प्रवाशांचा टप्पा पूर्ण
पुणे मेट्रोच्या सेवेत टप्प्याटप्प्याने झालेल्या विस्तारामुळे प्रवासी संख्येत सातत्याने मोठी वाढ झाली आहे. पुणे मेट्रोने १० कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडून केवळ एक आकडेवारी पूर्ण केलेली नाही, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या भविष्यातील विकासाची पायाभरणी केली आहे. जलद वाहतुकीमुळे व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आयटी हबपर्यंत पोहोचणे सोपे होऊन आर्थिक चालना मिळत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणारे उत्तम साधन असल्याने पुणे शहर अधिक हरित होण्यास मदत होईल. तसेच, उर्वरित फेज-१ चे विस्तार आणि प्रस्तावित फेज-२ मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. पुणे मेट्रोचे हे यश महामेट्रोचे अभियंते, कर्मचारी आणि प्रशासनाचे परिश्रम तसेच पुणेकरांच्या सहकार्याचे प्रतीक आहे. याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पुणे मेट्रो ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर पुणेकरांची ‘आपली मेट्रो’ बनली आहे,” या १० कोटी प्रवाशांमध्ये प्रत्येक पुणेकराचा विश्वास आणि सहभाग आहे. मेट्रोमुळे वेळेची बचत, आरामदायक प्रवास आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळाला असून, भविष्यात आम्ही उर्वरित टप्पे पूर्ण करून आणि अधिक चांगल्या सेवा देऊन पुणेकरांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत.या अभूतपूर्व यशाबद्दल पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांचे आभार, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.