
NCP receives a boost in Pune! Vaishalitai Kamasdar appointed as Women's Working President; Lahuji Jagde joins the party.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य वैशालीताई कामसदर यांची पुणे महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. आगामी कार्यकाळासाठी त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमात लहूजी जगदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत जाहीर प्रवेश केला.
पक्ष संघटन अधिक बळकट करणे, पक्षाची ताकद तळागाळापर्यंत अधिक भक्कम करणे आणि जनतेशी जोडलेली कार्यसंस्कृती मजबूत करणे हा प्रत्येकाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागातून हा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होत असल्याचे समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : ICC T20 Ranking : टी-20 क्रमवारीत दीप्ती शर्माला फटका! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पहिल्या क्रमांकावर मारली बाजी
“पक्ष संघटन बळकट करून ताकद तळागाळापर्यंत नेणे हा आपला सामूहिक उद्देश आहे.” उपमुख्यमंत्री अजित पवार
बाणेर येथे आयोजित “विजयी संकल्प सभा” या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुस–म्हाळुंगे परिसरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, अमोल बालवडकर यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा निर्णय अन्यायकारक असून कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित करणारा आहे, अशी भावना सुस–म्हाळुंगे परिसरात व्यक्त होत आहे.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, सुस–म्हाळुंगे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी सामूहिक निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक पातळीवरील विकासकामे, संघटन कौशल्य आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद पाहता अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारणे समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.