Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, राऊत म्हणाले…

संजय राऊतांना 100 दिवसांनी जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, माझ्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायालयाचे मी आभार मानतो असं जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मी तुंरुगात राहून कायदेशीर लढाई लढलो. माझ्या न्यायालयावर विश्वास आहे, त्यामुळं एक दिवस मला न्याय मिळेल असं वाटत होतं, आणि तसेच झालं.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 09, 2022 | 04:48 PM
जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, राऊत म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आज एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी म्हणजे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra chwal case) शिवसेना खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) दिलासा मिळाला असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  मात्र, ईडीने (ED) त्यांच्या जामीनाला विरोध केला होता. प्रत्येक तपास यंत्रणेला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. असं म्हणत ईडीने उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती, या प्रकरणी दुपारी तीन वाजता सुनावणी पार पडली असून, विशेष पीएमपीएल कोर्टाने (Court) खासदार संजय राऊत यांना दिलासा दिला आहे. तसेच ईडीला दुहेरी धक्का न्यायालयाने दिला आहे. जामीन स्थगिती देण्याच्या ईडीच्या मागणीला न्यायालयाचा नकार दिला आहे, त्यामुळं राऊतांची लवकरच सुटका होणार आहे. पण यानंतर सुद्धा जामीन दिल्याप्रकरणी तसेच स्थगिती अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला ईडी आव्हान देणार आहे. पण संजय राऊतांची आज सुटका होणार आहे.

[read_also content=”वाघ परत येतोय…आता तुमचा समाचार घेईल, भास्कर जाधवांचा विरोधकांना इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/now-tiger-is-coming-back-it-will-take-your-notice-bhaskar-jadhav-warning-to-opponents-343035.html”]

काय म्हणाले राऊत?

दरम्यान, संजय राऊतांना 100 दिवसांनी जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, माझ्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायालयाचे मी आभार मानतो असं जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मी तुंरुगात राहून कायदेशीर लढाई लढलो. माझ्या न्यायालयावर विश्वास आहे, त्यामुळं एक दिवस मला न्याय मिळेल असं वाटत होतं, आणि तसेच झालं. मला न्याय मिळाला आहे, यामुळं मी आनंदी आहे. मी पुन्हा एकदा न्यायदेवतेचे आभार मानतो असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसैनिकांमध्ये जल्लोष

दरम्यान, आज संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. संजय राऊतांच्या घरी दसरा दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सर्वंत्र ढोल-तासे वाजवण्यात येत आहेत. तसेच राज्यभरात फटाके वाजून आनंद साजरा केला जात आहे, लाडू व पेढे वाटून आनंद व्यक्त केला जात आहे, राऊत बाहेर येणार असल्यामुळं शिवसेनेचे तोफ पुन्हा एकदा धडाडणार असल्यामुळं ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. आज राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर आता ठाकरे गटातून देखील प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: After being granted bail sanjay raut first rection raut said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2022 | 04:45 PM

Topics:  

  • BJP
  • sanjay raut
  • Shinde-Fadnavis government

संबंधित बातम्या

महिला आरक्षण विधेयकावरून दिल्लीत रणकंदन! राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर भाजपचा एल्गार; ‘विश्वासघाता’चा आरोप करत जोरदार निदर्शने
1

महिला आरक्षण विधेयकावरून दिल्लीत रणकंदन! राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर भाजपचा एल्गार; ‘विश्वासघाता’चा आरोप करत जोरदार निदर्शने

Mira Bhayandar: व्हायरल व्हिडीओवरून भाजप शिवसेना आमनेसामने ; भाईंदरमध्ये राजकीय रणकंदन
2

Mira Bhayandar: व्हायरल व्हिडीओवरून भाजप शिवसेना आमनेसामने ; भाईंदरमध्ये राजकीय रणकंदन

संघर्षातून यशाचं शिखर : विनोद तावडे – ‘पार्टी विथ डिफरन्स’चा खरा चेहरा!
3

संघर्षातून यशाचं शिखर : विनोद तावडे – ‘पार्टी विथ डिफरन्स’चा खरा चेहरा!

एक ‘व्हॉट्सॲप कॉल’ अन् कारवाई ठप्प! आरएमसी प्रकल्पावरील कारवाईला धक्कादायक ब्रेक
4

एक ‘व्हॉट्सॲप कॉल’ अन् कारवाई ठप्प! आरएमसी प्रकल्पावरील कारवाईला धक्कादायक ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.