Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक ‘व्हॉट्सॲप कॉल’ अन् कारवाई ठप्प! आरएमसी प्रकल्पावरील कारवाईला धक्कादायक ब्रेक

पुणे शहरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर सुरू असलेल्या महापालिकेच्या कारवाईला अचानक ‘व्हॉट्सॲप कॉल’मुळे ब्रेक लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 18, 2026 | 11:40 AM
एक ‘व्हॉट्सॲप कॉल’ अन् कारवाई ठप्प! आरएमसी प्रकल्पावरील कारवाईला धक्कादायक ब्रेक

एक ‘व्हॉट्सॲप कॉल’ अन् कारवाई ठप्प! आरएमसी प्रकल्पावरील कारवाईला धक्कादायक ब्रेक

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर सुरू असलेल्या महापालिकेच्या कारवाईला अचानक ‘व्हॉट्सॲप कॉल’मुळे ब्रेक लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे पथक लोहगाव आणि धायरी परिसरात कारवाई करत असताना वरिष्ठांकडून आलेल्या संदेशानंतर कारवाई तात्काळ थांबविण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घडामोडींमुळे महापालिकेत राजकीय हस्तक्षेपाची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

महापालिकेच्या बांधकाम विभागाने लोहगाव परिसरातील एकूण १५ आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार पहाटेपासून पथकाने मोहीम हाती घेतली. मात्र, प्रत्यक्षात केवळ ९ प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली. त्यापैकी ७ प्रकल्प जमीनदोस्त करण्यात आले, तर २ प्रकल्पांना सील करण्यात आले. उर्वरित प्रकल्पांवर कारवाई न झाल्याने प्रशासनाकडून भेदभाव होत असल्याची टीका होत आहे.

कारवाईदरम्यान एका सत्ताधारी पक्षाच्या महिला नगरसेविकेच्या पतीने हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप असून, त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित व्यक्तीला सुरक्षा दलाच्या वाहनात बसवून पुढील कारवाई करण्यात आली. वडगाव खुर्द येथील आरएमसी प्रकल्पांवर शुक्रवारी पहाटे नियोजित असलेली कारवाई गुरुवारी रात्री अचानक रद्द करण्यात आली. एका बाजूला कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांत तक्रार करणारे प्रशासन, तर दुसऱ्या बाजूला एका आमदाराच्या दबावाखाली कारवाई थांबवल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

कारवाई सुरू असताना अचानक वरिष्ठांकडून संदेश आला. त्यानुसार कारवाई थांबविण्यात आली. — सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, पुणे महापालिका.

एकवाक्यता नसल्याचे चित्र

या कारवाईच्या निषेधार्थ आरएमसी प्रकल्प चालकांनी १६ एप्रिलपासून उत्पादन आणि वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, प्रकल्पांसाठी अद्ययावत मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महापालिकेनेही या पार्श्वभूमीवर ७० मुद्दे तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षातच या कारवाईबाबत एकवाक्यता नसल्याचे चित्र दिसून आले. स्थायी समिती अध्यक्षांनी कारवाईच्या निकषांवर प्रश्न उपस्थित केले, तर सभागृह नेत्यांनी कारवाई योग्य असल्याचे समर्थन केले

पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत असून आरएमसी प्रकल्पांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी सर्वंकष कार्यपद्धती (एसओपी ) तयार केली जात आहे. जे प्रकल्प चालक हे नियम पाळणार नाहीत, त्यांनी शहराबाहेर जावे. शहराच्या विकासासाठी आरएमसी आवश्यक आहे, पण नियमांचे पालन अनिवार्य आहे. — गणेश बीडकर, सभागृह नेते, पुणे महापालिका.

हे सुद्धा वाचा : मोठी बातमी ! पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; विमानसेवेवर मोठा परिणाम

Web Title: The administration has stopped the action on the rmc project in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • BJP
  • pune city
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.