Kolhapur News : 'ओ, कलेक्टर गाड्या कुठे आहेत?'; अजित पवारांचा पारा चढला अन् 'हा' आदेशच देऊन टाकला
Ajit Pawar Not Reachable: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील अनेक नेत्यामंध्ये नाराजीचा सुरू उमटू लागला आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची नाराजी समोर आली आहे. भुजबळांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत थेट राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचेही संकेत दिले आहेत. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केेले आहे. कालपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले पण पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही अजित पवार सभागृहात नसल्याचे चर्चांना उधाण आले आहे.
मिळाेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीत गेले आहेत. त्यामुळेच ते काल आणि आजही कोणालाच भेटले नाही की विधीमंडळाच्या अधिवेशनासाठीही थांबले नाहीत. महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खात्याचा पेच असल्याने अजित पवार दिल्लीला गेल्याचे सांगितले जातआहे. याशिवाय नवनिर्वाचित मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या महिला व बालविकास खात्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आग्रही आहेत. शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते. पण अर्थ खात्यासाठी आता भाजपकडून आग्रह धरला जात आहे. तर अजित पवारांना सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यासाठी भाजपचा प्रस्ताव आहे. पण महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळावे, यासाठी अजित पवारांकडून आग्रह धरला जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठीच ते दिल्लीला गेल्याची माहिती आहे.
Maharashtra Assembly Winter Session: सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू की हत्या?
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “आठ दिवसांपुर्वीच मला राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. पण मी ती स्पष्टपणे नाकारली. मी माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकत नाहीत. ती माझ्या मतदारांची प्रतारणा होईल. मी राज्यसभेवर जाणार नाहीत. त्यानंतर माझी आणि अजितदादांशी कुठलीही चर्चा झाली नाही. मी नाशिकमध्ये मतदार आणि समर्थकांना भेटणार आहे असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, शिवसेनेत पहिलं बंड करणाऱ्या छगन भुजबळांना 1991 साली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शरद पवार यांनी मंत्रिपद दिलं होतं. पण त्याच नागपूरातील हिवाळी अधिवेशनात 33 वर्षांनी शरद पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांचं मंत्रिपद डावललं. त्यामुळे हा अपमान भुजबळांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भुजबळ अजित पवारांची साथ सोडून पुन्हा मशाल हाती घेणार की तुतारी फुंकणार, असी चर्चा सुरू झाली आहे.
Ind Vs Aus: भारतावर Follow On चे संकट, टेस्ट क्रिकेटमधील फॉलो ऑनचे नियम, कस