Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

पुणे शहर भाजप माजी उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती त्यांच्या समर्थकांकडून मिळाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 04, 2026 | 03:36 PM
Pune News : पुण्यात भाजपला धक्का? 'हा' बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? 'हा' बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अनेक निष्ठावंताना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे काही जणांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. अशातच आता पुण्यात भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. गेली २५ वर्ष भाजपा मधे विविध पदांवर कार्यरत असलेले व स्वतःच्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून स्वतःची ओळख निर्माण करणारे पुणे शहर भाजप माजी उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती त्यांच्या समर्थकांकडून मिळाली आहे.

अमराळे यांनी २०१२ मधे महापालिका निवडणूक लढवली होती. काही मताने त्यांचा पराभव झाला होता. तेंव्हापासून त्यांना महानगरपालिका व विधानसभेसाठी भाजपकडून डावलले आहे. २०२६ च्या निवडणुकीत सुद्धा त्यांना प्रभाग १२ (छ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी) मधे त्यांना डावलण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वसाधारण गटात महिला उमेदवार देवून अमराळे यांच्यावर मोठा अन्याय केला गेला आणि हे सर्व एका नेत्याने जाणीवपूर्वक घडवून आणले असल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.

गेली २५ वर्ष सातत्याने या भागात त्यांनी देश – परदेशात ५५ यात्रांचे आयोजन केलेले आहे. त्यातून ३५००० नागरिकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला आहे. मोठ्या संख्येने हळदी कुंकू, रक्षाबंधन, कोजागिरी असे समारंभ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ३००० हून अधिक नागरिकांना व पोलिस बांधवांना वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांनी सन्मानित केले आहे. पालखी मार्गावर निर्मल वारी अभियान यशस्वी करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. दैनंदिन नागरिकांच्या अडचणी सोडवत असल्याने आणि नम्र व प्रेमळ स्वभावामुळे त्यांची मोठी लोकप्रियता या भागात असल्याचे दिसून येते. यामधून स्वतःची मोठी वोट बँक त्यांनी निर्माण केलेली आहे.

अमराळे यांच्या या निर्णयाने प्रभाग १२ च्या निकालावर परिणाम होवू शकतो हे लक्षात आल्याने राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी मुख्य नेत्यांकडून मोठे प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या १० तारखेला हा पक्ष प्रवेश होवू शकतो असेही अमराळे यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. अमराळे यांना याबाबत संपर्क केला असता त्यांनी २ दिवसात याबाबत माझी भूमिका विस्तृतपणे जाहीर करेल असे त्यांनी सांगितले.

Web Title: A big bjp leader from pune is going to join ajit pawars ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

स्वतंत्र शेतीमाल मंत्रालय स्थापन करा; दौंडचे आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी
1

स्वतंत्र शेतीमाल मंत्रालय स्थापन करा; दौंडचे आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी

Pune : आमचे कॅम्पस कचरापेटी बनवू नका, MIT च्या विद्यार्थ्यांची आर्त हाक!
2

Pune : आमचे कॅम्पस कचरापेटी बनवू नका, MIT च्या विद्यार्थ्यांची आर्त हाक!

Iran Israel युद्धामुळे लग्न थांबली? वधू-वरांची पंचाईत; केटरिंग व्यवसाय ठप्प अन् तारखा…
3

Iran Israel युद्धामुळे लग्न थांबली? वधू-वरांची पंचाईत; केटरिंग व्यवसाय ठप्प अन् तारखा…

Pune News : जांभोरी गाव होणार ‘मधाचे गाव’; २० बचत गटांतील आदिवासी महिलांचा स्त्युत्य उपक्रम
4

Pune News : जांभोरी गाव होणार ‘मधाचे गाव’; २० बचत गटांतील आदिवासी महिलांचा स्त्युत्य उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.