Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parth Pawar NCP Office Scam: मुंढवा जमीन प्रकरणानंतर नवा वाद; पार्थ पवारांवर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप

ही जागा शिवाजीनगर येथे असून त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 05, 2026 | 04:26 PM
पार्थ पवार संबंधित मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणात मोठी कारवाई; 'या' दोन अधिकाऱ्यांना सेवेतूनच केले बडतर्फ

पार्थ पवार संबंधित मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणात मोठी कारवाई; 'या' दोन अधिकाऱ्यांना सेवेतूनच केले बडतर्फ

Follow Us
Follow Us:

Parth Pawar NCP Office Scam:  मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण शांत होत नाही तोवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असून, या जागेच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत  काही गंभीर आरोप केले आहेत. संबंधित संस्थेची जागा भाड्याने देण्यास धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, संस्थेच्या विश्वस्तांनी नियमांचे उल्लंघन करून ही जागा विकल्याचा आरोप कुंभार यांनी केला. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

BMC Election 2026: भाजप-शिंदेसेना की ठाकरे बंधू.., मुंबईकरांचा कल कुणाकडे? सर्वेतून धक्कादायक माहिती समोर

पत्रकार परिषदेत बोलताना विजय कुंभार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी ज्याठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती, त्या जागेसंदर्भातील आजचा विषय आहे. महारेराच्या संकेतस्थळ उपलब्ध माहितीनुसार, या प्रकल्पाबाबत कोणताही करारस बंदी आहे. शिवाजीनगरमध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची जागा आहे. ही जागा विकसित करण्यासाठी कल्पवृश्र प्लॅन्टेशन नावाच्या कंपनीने हा प्रकल्प घेतला होता. कोण्त्याही संस्थेची जागा द्यायची असेल तर धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. तशी ती घेण्यात आली होती. पण ६० वर्षांच्या भाडेकरारावर ही परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी टेंडर काढण्यात आल्याचे भासवण्यात आले. पण या कंपनीने ही जागा विकली. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उभारण्यात आले आहे. ती जागा संशयास्पद आहे.”

“सरकारच्या सर्व तरतुंदीचा भंग करण्यात आला, महारेराचा आदेश असतानाही ही जागा राष्ट्रवादीला विकण्यात आली. धक्कादायक म्हणजे, भाजपाचाही सहभाग आहे. आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्याने अजित पवारांवर कारवाई होत नाही. म्हणूनच अजित पवारांना सातत्याने अडचणीत आणण्याचं काम भाजपाकडूनच केलं जातय”, असा दावा विजय कुंभार यांनी केला.

Local Body Election : “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची जागा विक्रीचा आरोप

१९३६ साली स्थापन झालेल्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या अर्ध्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जागेवरून माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केले आहेत.

कुंभार यांच्या मते, संबंधित जागा भाड्याने देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, भाडेपट्टा मंजूर असतानाही संस्थेच्या विश्वस्तांनी ही जागा थेट विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्यवहारामुळे संपूर्ण प्रकरण संशयास्पद ठरत असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title: Fresh controversy after mundhwa land case allegations over ncp office land deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Financial Scam
  • NCP Politics
  • parth pawar

संबंधित बातम्या

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
1

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
2

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
3

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Stamp Duty Scam: नवी मुंबईत हजारो कोटींचा दस्त नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश! दोषी अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ करणार
4

Stamp Duty Scam: नवी मुंबईत हजारो कोटींचा दस्त नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश! दोषी अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.