सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर पर्यटकांनी बहरु लागले आहे. कास’चा हंगाम १० सप्टेंबर रोजी सुरू झाला. कास पठारावर रंगीबेरंगी फुलांच्या छटा दिसू लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण असून कास पठार हंगाम सुरू झाल्यापासून जवळजवळ १०००० पर्यटकांनी कास पठारला आज अखेर भेट दिलेली आहे.
परंतु हंगाम सुरू झाल्यानंतर कधी जोराचा तर कधी रिप रीप पाऊस सुरूच होता, आणि त्यात कास पठार असणाऱ्या धुक्याची भर असल्याने फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची फुले दिसत नसल्याने निराशा होत होती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून या परिसरात पाऊस कमी झाला असून ऊन सुद्धा पडू लागल्याने कास पठारावर रंगीबेरंगी फुलांच्या छटा दिसू लागल्या आहेत.
[read_also content=”साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-third-in-the-world-in-sugar-production-congratulations-from-the-chief-minister-nrdm-327817.html”]
सध्या कास पठारावर चवर, रानवांगी, सापकांदा, तेरडा, सितेची आसवे, गेंद इत्यादी फुले दिसू लागलेत तर काही ठिकाणी निळ्या पांढऱ्या गुलाबी रंगाच्या छटा दिसू लागले आहेत. त्याचप्रमाणे कुमुदिनी तलाव परिसरामध्ये पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेल्या लाकडी मनोरा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणचा सेल्फी पॉईंट पर्यटकांसाठी आनंद देऊन जात आहे.