Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी सोलरच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टीका ; शेतकऱ्यांची मागणी, योजनांसाठी स्थानिक समितीची गरज

शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करता यावे म्हणून म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून  पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना अमलात आणण्यात आली. या माध्यमातून  सध्या वीजेची गैरसोय असलेल्या भागात शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अल्पदरात बसवून देण्यात येत आहेत.

  • By Aparna
Updated On: Dec 11, 2022 | 03:04 PM
कृषी सोलरच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टीका ; शेतकऱ्यांची मागणी, योजनांसाठी स्थानिक समितीची गरज
Follow Us
Close
Follow Us:

विठ्ठल मोघे, राजेगाव : शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करता यावे म्हणून म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून  पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना अमलात आणण्यात आली. या माध्यमातून  सध्या वीजेची गैरसोय असलेल्या भागात शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अल्पदरात बसवून देण्यात येत आहेत. मात्र, सौर कृषी पंप बसवण्याची जबाबदारी घेतलेल्या संबंधित कंपन्यांच्या ठेकेदारांकडून स्थानिक लाभार्थी  शेतकऱ्यांची विविध कारणास्तव पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे या योजनेला भ्रष्टाचाराचे गालबोट लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, तसेच अशा प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी  स्थानिक समित्यांची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कुसुम सौर कृषी पंप योजने अंतर्गत सौर कृषी पंप बसवण्याचे काम काही खाजगी कंपन्या घेत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यासाठी लागणारे  खडी, वाळू, सिमेंट आदी साहित्य संबंधित कंपनीनेच पुरविणे गरजेचे असतानाही  ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहेत. पंपाच्या जोडणीला लागणारे फिटिंगचे सामान शेतकऱ्यांनाच खरेदी करायला सांगत आहेत. मात्र,  या ठेकेदार कंपन्या शेतकऱ्यांना  पुरेश्या सुविधा देत नाहीत. लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर साठ दिवसांच्या आतमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप बसवणे बंधनकारक आहे. मात्र तरीही  अनेक अनेक शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून सौर कृषी पंप बसवले गेलेले नाहीत.

-ठेकेदारांकडून अटी शर्तीचे उल्लंघन
या ठेकेदारांकडून शासनाकडून  दिल्या जाणाऱ्या अटी शर्तीचे पालन केले जातं नाही. हलगर्जीपणाने कसे बसे सोलर पंप जोडले जात आहेत. त्याची फिटिंग ही व्यवस्थित केली जातं नाही. तशाच पद्धतीने शेतकऱ्यांना पंप सुरु करून दिले जातं आहेत. आम्ही सांगेल तिथे सही करा ; अन्यथा तुमचा पंप रद्द होईल, अशाही धमक्या काही ठेकेदारानी शेतकऱ्यांना केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच या सर्व पिळवणुकीविरोधात ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

[blockquote content=”केंद्र शासनाकडून कृषी सोलर योजना राबवली जात असून त्यासाठी लागणारे फिटिंग साहित्य शेतकरी बांधवांना  मोफत दिले असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व  असा प्रकार घडतं असल्यास महाऊर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सपंर्क साधावा. ” pic=”” name=”- महेश लोंढे, पोलीस पाटील, राजेगाव.”]

शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करता यावे म्हणून केंद्र सरकारने पीएम कुसुम सौर पंप योजनेच्या माध्यमातून  शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसवले जात आहेत.  मात्र,  पंप बसवणाऱ्या कंपनीच्या ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. अशा ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.
– राहुल पवार, व्यावसायिक व शेतकरी.

सोलर पंप जोडणी  साहित्य निकृष्ट दर्जाचे असून फिटिंग साहित्य ही हलक्या स्वरूपाचे आहे. पंप बसवणाऱ्या कामगारांना  पुरेसा अनुभव नसल्याने पंपाची  फिटिंग व्यवस्थित केली जात नाही.
– अक्षय नांगरे, स्थानिक शेतकरी.

केंद्र शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत. प्रत्येक गाव पातळीवर अशा योजनेच्या देखरेखीसाठी  स्थानिक समिती  तयार करून तिचे नियंत्रण या कामगारावर राहिले तर अशा प्रकाराला लवकर आळा बसेल.
– अरुण भोई,  जिल्हा अध्यक्ष, ओबीसी फाउंडेशन.

Web Title: Agricultural solar contractor criticized for blacklisting demand of farmers need of local committee for schemes nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2022 | 02:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Rajegaon

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.