Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर हालचाली सुरू असतानाच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सूचक भूमिका मांडली आहे. सर्वांचा मान-सन्मान राखून आणि व्यक्तिगत राजकीय हित बाजूला ठेवून निर्णय झाल्यास बिनविरोध निवडणूक शक्य असल्याचे त्यांनी म्हटले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 28, 2026 | 06:12 PM
जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी राजकीय हालचाली तेजीत
  • ‘सर्वांचा मान राखला तरच बिनविरोध’, राम शिंदेंची भूमिका
  • जिल्हा बँक निवडणुकीवर राम शिंदेंचा सूचक इशारा
पोपट पिटेकर, अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात होताच जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. दुष्काळाच्या छायेत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय हालचालींना वेग आला असतानाच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रक्रियेत कोणाचाही ‘स्वतंत्र अजेंडा’ चालणार नाही, असा सूचक इशारा दिला आहे. “जिल्हा बँक सर्वांची आहे. अडचणीत असलेल्या शेतकरी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे; मात्र कोणी स्वतःचा अजेंडा रेटू नये,” अशी भूमिका शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. (Ahilyanagar News)

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका यापूर्वीच मांडली होती. त्यानंतर बिनविरोध निवडणुकीच्या हालचालींना वेग आला. रविवारी संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने प्राथमिक सहमती झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीनंतर आता तालुकानिहाय चर्चा करून अंतिम तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

मात्र, या बैठकीला राम शिंदे उपस्थित नव्हते. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका काय असणार, हा प्रश्न उपस्थित झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना बिनविरोध निवडणुकीला विरोध नसल्याचे सांगितले; परंतु सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच निर्णय झाला पाहिजे, असे बजावले. “सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर चांगला संदेश जाईल. पण कोणी स्वतःचा स्वतंत्र अजेंडा चालविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते गैर आहे. जिल्हा बँक ही सर्वांची कामगिरी आहे आणि तिचे संचालक मंडळही सर्वांना सोबत घेऊन उभे राहिले पाहिजे,” असा स्पष्ट संदेश शिंदे यांनी दिला.

दुष्काळाच्या सावटात निवडणुकीचा खर्च कशासाठी?

सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकीय संघर्ष पेटविण्याऐवजी सामंजस्याने मार्ग काढण्याची गरज आहे, असे शिंदे यांनी सांगितले. जिल्हा बँक ही केवळ राजकीय सत्तेचे केंद्र नसून शेतकरी, ठेवीदार आणि कर्जदारांशी जोडलेली महत्त्वाची सहकारी संस्था आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली तर सहकार क्षेत्रात सकारात्मक संदेश जाईल, अशी भूमिका सर्वपक्षीय बैठकीतही मांडण्यात आली होती. मात्र, बिनविरोधचा निर्णय घेताना कोणाला किती जागा, कोणत्या गटाला किती प्रतिनिधित्व आणि इच्छुकांना कशा पद्धतीने सामावून घेतले जाणार, हे प्रश्न आता महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे बिनविरोधचा नारा देणे सोपे असले तरी प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी खरी कसोटी लागणार आहे.

थोरातांच्या बैठकीत काय ठरले?

संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बँकेच्या २१ संचालकपदांपैकी काही जागांवर सर्वानुमते उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली. उपलब्ध वृत्तांनुसार सात जागांबाबत बिनविरोधचा फॉर्म्युला ठरविण्याच्या दिशेने चर्चा झाली असून उर्वरित सेवा सोसायटी मतदारसंघातील १४ जागांसाठी स्वतंत्र पॅनलची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. थोरात आणि सुजय विखे पाटील यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्याबाबतही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, या चर्चेतील अंतिम स्वरूप उमेदवारी अर्ज आणि पुढील तालुकानिहाय चर्चेनंतरच स्पष्ट होणार आहे.

याच बैठकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर चर्चेला उधाण आले आहे. दीर्घकाळ राजकीय विरोधात राहिलेले थोरात आणि विखे गट बँकेच्या निवडणुकीसाठी एका व्यासपीठावर आल्याने सहकार क्षेत्रातील समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाल्याचे चित्र आहे. परंतु, या प्रक्रियेत प्रत्येक तालुका आणि प्रत्येक इच्छुक गटाला विश्वासात घेणे आवश्यक आहे. अन्यथा बिनविरोधची चर्चा एका बाजूला आणि प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी दुसऱ्या बाजूला, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

राम शिंदे उमेदवारी करणार का?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतः उमेदवारी करणार का, या प्रश्नावर राम शिंदे यांनी थेट अंतिम घोषणा केली नसली तरी आपल्या सक्रिय सहभागाचे स्पष्ट संकेत दिले. गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतच आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबत सूचक भूमिका मांडली होती, असे त्यांनी सांगितले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन विविध कार्यकारी संस्थांनी आपल्या नावाने ठराव पारित केले आहेत. तसेच तालुका प्रतिनिधींच्या मतदार यादीत आपले नाव असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपण निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय असल्याची चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी चेअरमन आणि अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्यामुळे निवडणुकीत पॅनल उभे करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात होते. त्यावर शिंदे यांनी सहकार क्षेत्रात सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागते, हे स्पष्ट केले. “मी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे यापूर्वीच सांगितले आहे. माझ्या नावाने ठराव झाले आहेत. मतदार यादीतही माझे नाव आहे. त्यामुळे माझ्या सक्रियतेची चर्चा होणे गैर नाही. मात्र सहकारात सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागते,” असे शिंदे यांनी सांगितले.

‘बँक टिकली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे!’

जिल्हा बँकेच्या भवितव्याबाबत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करताना बँक टिकली पाहिजे आणि सक्षम झाली पाहिजे, यावर भर दिला. सर्वसामान्य शेतकऱ्याला बँकेचा फायदा झाला पाहिजे. त्याचबरोबर सहकारी क्षेत्रातील इतर संस्थांनाही बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारातील जुन्या प्रथा आणि परंपरा पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी बँकेच्या निवडणुकीकडे केवळ राजकीय प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहू नये, असा संदेश दिला. बँकेच्या संचालक मंडळात विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. कोणत्याही एका गटाचा किंवा व्यक्तीचा प्रभाव निर्माण करण्याऐवजी बँकेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे, हा त्यांच्या भूमिकेचा मुख्य सूर होता.

‘माझ्याकडेही अनेक जण काम घेऊन येत आहेत’

बिनविरोध निवडणुकीच्या प्रक्रियेत आपली भूमिका काय असेल, याबाबत बोलताना शिंदे यांनी आपल्याकडेही अनेक इच्छुक येत असल्याचे सांगितले. मात्र, जिल्ह्याच्या पातळीवर सर्वमान्य निर्णय झाला तर त्यानुसार पुढे जाण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

“माझ्याकडेही अनेक लोक काम करीत आहेत. त्यांनाही मी सांगत आहे की, एकदा जिल्ह्याचा निर्णय झाला आणि सर्वांच्या सहमतीने एखादी गोष्ट ठरली तर त्यानुसार पुढे जावे लागेल,” असे ते म्हणाले. मात्र, थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीतील अंतिम धोरण अद्याप आपल्यापर्यंत आलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बैठकीत नेमके काय ठरले, याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन

बैठकीचा ‘संदेश’ सर्वांपर्यंत पोहोचवा!

संगमनेरच्या बैठकीनंतर आता तालुकानिहाय बैठका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रक्रियेत सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा होणे आणि बैठकीतील निर्णयाचा स्पष्ट संदेश सर्व इच्छुकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी सांगितले. “ज्यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली त्यांनी सर्वांशी सुसंवाद साधून निवडणूक पुढे नेली पाहिजे. कालच्या बैठकीचा अजेंडा किंवा धोरण अजून माझ्यापर्यंत आलेले नाही. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच पुढे जाणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे राम शिंदे यांनी बिनविरोधला विरोध न करता ‘सर्वांना सोबत घ्या’ आणि ‘स्वतंत्र अजेंडा नको’ असा स्पष्ट संदेश दिल्याने आता थोरातांच्या नेतृत्वाखालील समन्वय प्रक्रियेला शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवार आणि विविध गटांना समाधानकारक प्रतिनिधित्व देण्याचे आव्हानही समोर आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी ‘बिनविरोध’च्या पडद्यामागे जागावाटपाचा खरा सामना रंगणार का, सर्वांना सोबत घेऊन तडजोडीचा फॉर्म्युला निघणार का आणि राम शिंदे यांची पुढील भूमिका काय राहणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ahilyanagar district bank election ram shinde warning over unopposed polls and political agenda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Bank

संबंधित बातम्या

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर
1

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक
2

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’  सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार
4

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’ सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.