
मांडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका प्रेरणादायी उपक्रमाची जोरदार चर्चा
सुनील गर्जेय/नेवासे: नेवासे तालुक्यातील मांडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळा आकाराने लहान असली तरी तिच्या उपक्रमांनी मोठ्या शाळांनाही प्रेरणा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी आणि शाळेला नवचैतन्य देण्यासाठी येथील शिक्षकांनी राबवलेले उपक्रम सध्या चर्चेत आहेत.
शाळेतील शिक्षकांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीला आधुनिक स्पर्श देत पाठ्यपुस्तकातील धडे, इंग्रजी–मराठी शब्दसंग्रह, तसेच गणितातील उदाहरणे थेट शाळेच्या भिंतींवर आकर्षक चित्रांच्या स्वरूपात साकारली आहेत. त्यामुळे विद्यार्थी भिंतींकडे पाहत सहजपणे संकल्पना आत्मसात करत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असूनही शिक्षकांनी सुट्टीच्या काळातही अध्ययन निष्पत्ती वाढवण्यावर भर देत विशेष मार्गदर्शन केले.
Local Body Elections: दुबार मतदान करताना आढळल्यास….; ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांनी दिला कारवाईचा इशारा
विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी वाढवण्यासाठी त्यांचा वाढदिवस शाळेत साजरा केला जातो आणि त्यांना शैक्षणिक व खेळ साहित्य भेट दिले जाते. या उपक्रमांना गावचे सरपंच अंकुश धंदक, उपसरपंच महेश काकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक शिंदे, राहुल शिंदे, रमेश शिंदे, दिलीपराव सोनवणे, दत्तात्रय थोरात, बाळासाहेब सुरुसे, विकास सुरुसे यांचे सहकार्य लाभले आहे. गटविकास अधिकारी संजय लखवाल, गटशिक्षण अधिकारी साईलता समलेटी आणि केंद्रप्रमुख संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्रीहरी तांबडे आणि शिक्षिका संगीता मते परिश्रम घेत आहेत.
शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यार्थी एकमेकांशी इंग्रजीत संवाद साधतात. “एक पेड, माँ के नाम” उपक्रमांतर्गत शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांची शिस्त, वर्ग आणि शाळा परिसरातील स्वच्छता उल्लेखनीय असून यामागे शिक्षकांसोबत ग्रामस्थांचेही मोठे योगदान आहे.
शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
शिक्षकांनी ग्रामस्थांशी संवाद साधत 25,000 रुपये निधी उभारला. या निधीतून भिंतीवरील शैक्षणिक चित्रांकन, रंगरंगोटी आणि सजावट करण्यात आली. तसेच शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी विविध शैक्षणिक अॅप्सचा वापर करून विद्यार्थ्यांच्या दढीकरणावर भर दिला जात आहे.