दुबार मतदार आढळल्यास कडक कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा (फोटो- सोशल मीडिया)
३ नगरपरिषद १ नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
७४ मतदान केंद्र असून ५७२०७ एकूण मतदार
अधिकाऱ्यांना दिले कर्मचारी नियुक्ती करण्याचे आदेश
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ नगरपरिषद व १ नगरपंचायत अशा सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले आणि कणकवली या ४ निवडणुका होत असून ७४ मतदान केंद्रांवर निवडणूक शांततेत पार पडेल या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्या दृष्टीने पिंकव आदर्श मतदान कक्षकरण्याची तयारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती व लोकप्रतिनिधींना माहिती मार्गदर्शन देण्यात येत असून २७५ व्यक्तींचे २ किंवा ३ ठिकाणी असे ५५७नावे आढळली आहेत, अशा व्यक्तींकडून खात्री करून दुबार मतदान होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
दुबार मतदान करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाणार, जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही, संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासन व निवडणूक प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहोत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.
७४ मतदान केंद्र असून ५७२०७ एकूण मतदार
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिषद सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक आऊंदकर आदींसह उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणूक कार्यक्रमांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कणकवली, सावंतवाडी व वेंगुला या ४ नगरपंचायत व नगरपरिषदेचा समावेश आहे. या ४ ही नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये ७४ मतदान केंद्र असून ५७२०७ एकूण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
संतापजनक! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू; चेकअप करून घरी गेला अन् थोड्याच वेळात…
अधिकाऱ्यांना दिले कर्मचारी नियुक्ती करण्याचे आदेश
निवडणुकीसाठी अधिकाऱ्याऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन आधी ही बैठक झाली असून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन उपलब्ध झाल्या असून त्याचे स्कॅनिंग झाले आहे. संबंधित नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांना कर्मचारी नियुक्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनामार्फत हालचाली सुरू असून या निवडणुका शांततेत पार पडाव्यात या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.






