Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: लालबुंद कलिंगडाबरोबर विष मोफत! केमिकलयुक्त कलरचा होतोय वापर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उन्हाळयात अनेक जण हायड्रेट राहण्यासाठी कलिंगड खात असतात. मात्र, हल्ली फळविक्रेते केमिकलयुक्त कलरचा कलिंगड विकत आहे. यामुळे नागिरकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 06, 2026 | 08:50 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

सुनील गर्जे/नेवासे: उन्हाच्या तडाख्यापासून आल्हाददायक दिलासा देणारे रसाळ फळ म्हणजे कलिंगड. मात्र, आंबा, केळी फळांन पाठोपाठ आता बाजारात विषयुक्त कलिंगड येत आहेत. टरबूजाला गर्द लाल रंग देण्यासाठी त्यामध्ये चक्क केमिकलयुक्त इंजेक्शनचा सर्रास वापर होत आहे. दरम्यान हा प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात तर ग्रामिणी भागात काही ठिकाणीच अनुभवास येतो.

टरबूज लाल करण्यासाठी वापरण्यात येणारा कृत्रिम रंग मानवी शरिरासाठी अतिशय हानिकारक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. आंबे व इतर फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा मोठया प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले. केमिकल्सचा सर्रास वापर करून फळे पिकविली जात असल्यामुळे कर्करोगासारखे भंयकर आजार बळावत आहेत. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासन विभाग मात्र सुस्त आहेत.

शासकीय निवासस्थानी ‘मटणावळ’ अन् ‘दारूचा पूर’; महावीर जयंतीदिनी जलसंपदा विभागाचा ‘नंगा नाच’, कृष्णा खोरे महामंडळ चर्चेत

कालिंगडाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या जिवघेण्या खेळापासून नागरिक मात्र अनभिज्ञ असतात. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यात दररोज सुमारे १५० ते २०० क्विंटल टरबूजांचा लिलाव होतो. अहिल्यानगर व श्रीरामपूर येथूनच त्यांचे विविध किरकोळ व्यापाऱ्यांसह हातगाड्यांवर वितरण केले जाते. कलिंगड आतून लालगर्द व्हावे, यासाठी असे इंजेक्शन टोचले जाते. जिल्ह्यासह मराठवाड्‌यातून अनेक जिल्ह्यात कलिंगडाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणारा माल गावरानी तर पराराज्यातून औषधी इंजेक्ट करून लाल केलेले कलिंगड जिल्ह्यात येत आहे.

विषारी औषधांची केली जाते फवारणी

टरबूज मोठे करण्यासाठी सायरस, जिर्गोरिक ॲसिडची टरबूजाच्या वेलीवर फवारणी केली जाते. ०५२ – ३४ हे पेस्टीसाईड वापरले जाते. यामध्ये मोनो पोटॅशिअम फोस्फेट नावाचा घटक असल्यामुळे टरबूज मोठे व टवटवीत दिसते. हे अधिकृत असले तरी इतर विषारी रासायनिक औषधाची टरबूजांवर फवारणी होत असल्यामुळे ते शरीराला हानीकारक आहे.

Kolhapur News : प्रशासनाचे दुर्लक्ष, अपुऱ्या शिक्षकांवर अनेक वर्गाचा ताण; गगनबावडा तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा

कृत्रिम रंग मानवी शरीरासाठी हानिकारक

बाजार समितीत कलिंगडाचे भाव सकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान किलोवर ठरविले जातात तर श्रीरामपूर, राहुरी येथील बाजार समितीच्या आवारात सकाळी 7-8 वाजता कलिंगडचा लिलाव होतो. यातून कोट्यवधींची दररोज विक्री होते. शेकडो हातगाडीधारक फेरीवाले, किरकोळ व्यवसायिक येथून टरबूजांची घाऊक भावात खरेदी करतात.

जिल्ह्यात मुळा, प्रवरा व गोदावरी नदीच्या पात्रालागत शेतीमध्ये विविध प्रजातीच्या लहान कलिंगडचे उत्पादन घेतले जाते. याचा आकार वाढविण्यासाठी अनेक प्रकारच्या पेस्टीसाई व खतांचा वापरही केला जातो. कुठल्याही कृषीसेवा केंद्रात ते उपलब्ध होते. ते शासनमान्य असल्याने याचा धोका नसल्याचे कृषी सेवा केंद्राच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Ahilyanagar news chemical injected watermelon health risk artificial color fruits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Watermelon Market

संबंधित बातम्या

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
1

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
2

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
3

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
4

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.