Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: आधी पावसाने झोडपलं त्यात खतांच्या दरवाढीने कंगाल केलं! शेतकऱ्यांच्या ‘रब्बी’ चे गणित बिघडले

एकीकडे परतीच्या पावसाने नगर जिल्ह्याला झोडपले असतानाच आता रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना डबल फटका बसला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 29, 2025 | 07:05 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • रासायनिक खतांच्या किमतीत वाढ
  • अहिल्यानगर मधील शेतकरींना फटका
  • शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचे गणित बिघडले

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आधीच चांगलेच झोडपले असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने त्यांचा आर्थिक समतोल पूर्णपणे बिघडवला आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि उत्पादन खर्चातील वाढ, तर दुसरीकडे बाजारभावातील अनिश्चितता, या दुहेरी संकटामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.

खतांच्या दरात तब्बल 200 ते 400 रुपयांपर्यंत वाढ

रब्बी हंगामाच्या उंबरठ्यावर रासायनिक खतांच्या किमतींमध्ये अचानक वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. प्रत्येक पिशवीमागे तब्बल 200 ते 400 पर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

Bacchu Kadu: बच्चू कडूंना मोठा धक्का! मोर्चाबाबत नागपूर खंडपीठाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

गहू, हरभरा, ज्वारीसह इतर रब्बी पिकांसाठी खतांची मोठ्या प्रमाणावर गरज असते. मात्र खतांचे दर वाढत असताना, कांदा, कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचे बाजारभाव घटलेले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला, पण उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

‘लिंकिंग’ची जबरदस्ती,  शेतकऱ्यांचा संताप

दरम्यान, काही कृषी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांवर खते विक्रीसह लिंकिंगची जबरदस्ती केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रासायनिक खतांसोबत वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर, मायक्रोला आणि मायक्रोरायझा हे उत्पादन जबरदस्तीने विकले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतमालाचे भाव घटलेले असतानाच खते, मजुरी आणि बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. “खतांचे दर हा उत्पादन खर्चातील महत्त्वाचा घटक असून शेती आता परवडणारी राहिलेली नाही,” अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत; संजय राऊतांची टीका

राजकीय प्रतिक्रिया

“केंद्र सरकार हे पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. शेतमालाला हमीभाव नाही, त्यात खत दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. ही वाढ केंद्राच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. दर कमी करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे आवश्यक आहे.” असे म्हणणे काँग्रेस नेते संभाजी माळवदे यांचे होते.

“अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच उध्वस्त झाला आहे. शासन एकीकडे दुष्काळाचा दाखला देते आणि दुसरीकडे खतांचे दर वाढवते. हा प्रकार म्हणजे ‘आवाहन देऊन भोपळा घेणे’ असाच आहे. सरकारने दरवाढ मागे घ्यावी आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी.” असे म्हणणे युवा शेतकरी रामदास घुले, तरवडी (ता. नेवासे) यांचे होते.

Web Title: Ahilyanagar news farmers in financial problem checmical fertilizers price increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers
  • maharashtra news

संबंधित बातम्या

‘अंत्योदय’ चे तीन तेरा, शपथ की स्टंट? नायगावातील भ्रष्टाचारावर आमदार राजेश पवारांची ‘गांधीगिरी’ की ‘राजकीय नाट्यगिरी
1

‘अंत्योदय’ चे तीन तेरा, शपथ की स्टंट? नायगावातील भ्रष्टाचारावर आमदार राजेश पवारांची ‘गांधीगिरी’ की ‘राजकीय नाट्यगिरी

आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाहणीत पितळ पडले उघडे, ठाण्यातील तीन आरोग्य मंदिरे बंदच
2

आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाहणीत पितळ पडले उघडे, ठाण्यातील तीन आरोग्य मंदिरे बंदच

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया
3

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ
4

५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.