मोर्चास्थळ रिकामे करण्याचे हायकोर्टाचे आदेश (फोटो- सोशल मीडिया)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक
नागपुरात एकटवले शेतकरी नेते
मोर्चाचे स्थळ रिकामे करण्याचे कोर्टाचे आदेश
नागपूर: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेकडो शेतकऱ्यांसह त्यांनी उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मोर्चा केला आहे. दरम्यान सरकारचे शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीला जाणार आहे. त्यातच आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना धक्का दिला आहे.
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांना महत्वाचे आदेश देण्यात आले आहे. आज संध्याकाळी 6 पर्यंत आंदोलनाचे स्थळ रिकामे करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. आंदोलन स्थळाच्या शेजारी शाळा, रूग्णालय असल्याने कोर्टाने नमूद करत सुमोटो याचिका दाखल केली.
बच्चू कडूंनी फोडला फडणवीस सरकारला घाम
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेकडो शेतकऱ्यांसह त्यांनी उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मोर्चा केला आहे. बच्चू कडू यांच्या विराट मोर्चाने नागपूर-वर्धा आणि नागपूर-जबलपूर या प्रमुख महामार्गावर ठाण मांडल्याने शहराच्या आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. बच्चू कडू यांच्या विराट मोर्चामुळे फडणवीसांच्या महायुती सरकारला घाम फोडला आहे.
मुंबईत बैठकीसाठी कडूंचा नकार
आंदोलक बच्चू कडू यांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आले. याबाबत त्यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बोलणे देखील झाले. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. बच्चू कडू म्हणाले की, “आमचे आंदोलन सुरू असताना आम्ही ते सोडून मुंबईतील बैठकीला येऊ शकत नाही. नागपूरला या. नागपूरला मंत्रालय आहे, तिथे बैठक घ्या. तुम्हाला जातीयवादी मोर्चात जाता येतं, तर शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झाले, असा सवाल त्यांनी बावनकुळेंना केला. यापूर्वी दोन बैठका झाल्या, पण फक्त अपंगांसाठीच निर्णय झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले. विमानातून जा-ये आणि बैठकीसाठी पूर्ण दिवस वाया जाईल, ज्यामुळे आंदोलन हातात राहणार नाही. तुम्ही आमचं आंदोलन बैठकीच्या नावाने मोडून काढत आहात, असा गैरसमज होतोय, असेही बच्चू कडूंनी म्हटले.






