
Ahilyanagar News: सुकेवाडीत पकडला तब्बल सव्वा कोटींचा गांजा, तस्कर मात्र फरार
राजकारणातील चाणक्य Sharad Pawar यांच्या Car Collection वर एकदा नजर फिरवाच
संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावात काही तरुण अमली पदार्थांची विक्री करत असून, मोठे रॅकट यात गुंतलेले असल्याची गोपनीय माहिती नाशिक विभाग आमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे पोलिस उपअधीक्षक गुलाबराव पाटील यांना समजली. ते स्वतः पथकासह सुकेवाडीत दाखल झाले. सुकेवाडी गावामध्ये तुषार पडवळ यांच्या घरातून हे गांजाचे रॅकेट चालत असल्याची पाटील यांची खात्री झाली. पडवळ याच्या घराची झडती घेतली असता ३०० किलो गांजा मिळून आला. त्यामुळे संपूर्ण घराची झडती घेण्यात आली.
पडवळच्या घराच्या परिसरातच एक छोटा हत्ती म्हणजेच टेम्पो उभा होता. त्याची तपासणी केली असता गांजाचे पॅकेट करून ठेवलेले आढळले. त्यावर मोठा पडदा टाकलेला होता. पडदा काढला तेव्हा टेम्पोत १५० किलो गांजाची पाकिटे मिळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजातस्करी पकडण्यात आल्यामुळे अमली पदार्थ प्रतिबंधक टास्क फोर्सचे पोलिस उपअधीक्षक गुलाब पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत असून, स्थानिक पोलिसांबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 68 शब्दांत गुंडाळला; सभागृहात झाला शाब्दिक वाद
संगमनेर शहरात गांजा, ड्रग्जसारखे अमली मोठ्या प्रमाणात येऊन तरुणांना त्यात ओढले जात आहे. गुटखातस्करीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर निर्बंध आणण्यात संगमनेर पोलिस अपयशी ठरत असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे, नाशिकच्या टास्क फोर्सने अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्याची मागणी संगमनेरकर करत आहेत.