Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ठराव गेला केराच्या टोकरीत! दारूबंदी असूनही राजुरीत अवैध दारू विक्री सुरु

दारूबंदी असणाऱ्या राजुरीत अवैधरित्या दारू विक्री होताना दिसत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 07:57 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • राजुरीत अवैध दारू विक्री सुरु
  • दारूबंदीचा ठरावाचा विसर
  • ग्रामस्थांकडून कठोर कारवाईची मागणी
दारुबंदी असलेल्या राजूर गावात गल्ली बोळात अवैध दारु विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. अवैध दारूविक्रीसोबतच गुटका, ताडी, जुगार आदी धंदे फोफावल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अवैध व्यावसायिक आणि काही पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे राजूर पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देत कारवाई करण्याचे साकडे राजूर ग्रामस्थांनी घातले आहे. आदिवासी विभागाचे केंद्र बिंदु असलेल्या राजूर गावात सन २००५ मध्ये दारुबंदीचा ठराव होऊन सहा देशी-विदेशी दारु दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Ahilyanagar News: शेवगाव आणि पाथर्डीला गारपीटीने झोडपले; शेतकरी मोठ्या संकटात

अवैध धंदे आणि दारूच्या व्यसनापायी गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सततच्या भांडणापायी ग्रामपंचायतीने राजूर येथील अवैध धंदे बंद करण्यासोबतच परिसरातील अवैध दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेतला. मात्र राजूर पोलिस आणि दारू उत्पादन शुल्क विभागाच्या वरदहस्तामुळे गावातील अवैध दारू विक्रीसोबतच गुटका, जुगार, ताडी यासारखे अवैध धंदे जोमात आले आहेत. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी ग्रामसभेत अवैध दारुबंदीचा अनेकदा ठराव केला. तसेच अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजूर पोलिस ठाण्याचा उंबरठा झिजवला आहे. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, दारुबंदी कार्यकर्ते आता मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारी आहेत. राजूर गावातील भर बाजारपेठेसह दिंगबर रोड, ग्रामपंचायत कार्यालयामागे अवैध दारू विक्री केली जाते.

संघटना, ग्रामस्थांचा पुढाकार हवा

अवैध दारु विक्रेते, गुटका व रेती तस्करासोबतचे पोलिस अधिकाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध सामान्य नागरिकांना खटकणारे आहेत. गावात चाललेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्याऐवजी चालना मिळत असल्याने मुख्य सुत्रधार कोण?, कुणाकुणाचे संगनमत आहे?, याबाबत संशय व्यक्त होत आहे. वारंवार पोलिसांचे लक्ष वेधूनही फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. या व्यावसायांना अंकुश लावण्यासाठी सामाजिक संघटनांसोबतच ग्रामस्थांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.

Swami Samarth Prakat Din: म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा, दर्शनासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

पोलिस ठाण्यातील ऊठबस सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

अनेकांचे संसार वाचविण्यासाठी राजूर ग्रामपंचायतने अनेकदा मासिक सभेत अवैध धंदे आणि दारूबंदीसाठी ठराव केला. सरपंच, ग्रामसचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या ठरावाची प्रत राजूर पोलिस स्टेशनला देण्यात आली. मात्र, पोलिसांकडून अद्याप उपाययोजना झाल्या नाहीत. याउलट गावातील अवैध व्यावसायिकांची पोलिस प्रशासनाकडून पाठराखण केली जात आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यासह पोलिसांच्या मोबाईलवरील संभाषणाची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राजूर पोलिस ठाण्यात अवैध व्यवसायिकांची नेहमीच वर्दळ असते. त्याचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसत आहे.

Web Title: Ahilyanagar news illegal liquor sale continues in rajuri despite prohibition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
1

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु
2

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण
3

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात
4

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.